मुंबई : 4 मार्च रोजी दिग्गज स्पिनर शेन वॉर्नचं निधन झालं. दरम्यान वॉर्नचा खास मित्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासोबत अनेक किस्से आहे. यामधील काही किस्से ऑनफिल्ड आहेत तर काही किस्से ऑफफिल्ड आहेत. नुकतंच वॉर्नवर आधारित असलेली एक डॉक्युमेंट्री एमेझॉन प्राईमवर रिलीज झाली. यामधील एक किस्सा समोर आलाय जेव्हा वॉर्न सचिनच्या घरी जेवायला गेला होता.
1998 मध्ये ऑस्ट्रेलियाची टीम भारत दौऱ्यावर आली होती. त्यावेळी सचिनने वॉर्नला जेवणासाठी घरी बोलावलं होतं. वॉर्न या डॉक्युमेंट्रीमध्ये म्हणतो, सचिन आणि मी चांगले मित्र आहोत. जेव्हा आम्ही भारतात यायचो तेव्हा भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामना नव्हे तर वॉर्न विरूद्ध सचिन असा सामना व्हायचा. एकदा मी त्याच्या घरी गेलो होतो. मला वाटलं होतं आम्ही डिनरनंतर होटेलवर जाऊ. मी जेवायला चिकनपासून सुरुवात केली आणि माझं डोकं भिरभिरायला लागलं."
सचिन देखील या किस्स्याबद्दल सांगतो की, "आम्ही मुंबईमध्ये होतो आणि मी त्याला विचारलं की जेवायला माझ्या घरी ये. यावेळी मी त्याला भारतीय जेवण आवडतं का? असं विचारलं. यावेळी त्याने आवडतं असं उत्तर दिलं. वॉर्नने जेव्हा त्याच्या ताटात अन्न घेतलं तेव्हा मला जाणवलं की त्याला तिखट खाण्यास जमणार नाही. मला वाईट वाटू नये म्हणून तो मॅनेजरकडून मदत मागत होता. दरम्यान संध्याकाळी वॉर्न स्वतः किचनमध्ये जाऊन जेवण बनावलं."
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्नच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याची माहिती थायलंड पोलिसांनी दिली आहे. पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांचा अहवाल वॉर्नच्या कुटुंबीयांना आणि ऑस्ट्रेलियन दूतावासाला पाठवण्यात आला आहे, असं राष्ट्रीय पोलिस उपप्रवक्ता किसाना पठानाचारोन यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. वॉर्नचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला याबद्दल त्याच्या कुटुंबीयांना कोणतीही शंका उपस्थित केलेली नाही असंही यात म्हटलं आहे.