Shubman Gill : सारा नव्हे तर लंडनमध्ये 'या' अभिनेत्रीसोबत दिसला शुभमन गिल; काय आहे प्रकरण?

Shubman Gill : वर्ल्डकप संपल्यानंतर आता शुभमन गिलचा एका अभिनेत्रीसोबतचा फोटो व्हायरल होताना दिसतोय. या फोटोमध्ये शुभमन अभिनेत्री अवनीत कौरसोबत दिसतोय. 

सुरभि जगदीश | Updated: Dec 6, 2023, 12:47 PM IST
Shubman Gill : सारा नव्हे तर लंडनमध्ये 'या' अभिनेत्रीसोबत दिसला शुभमन गिल; काय आहे प्रकरण? title=

Shubman Gill : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शुभमन गिलच्या खेळाची मोठ्या प्रमाणात चर्चा होते. मात्र त्याच्या खेळाप्रमाणेच त्याच्या पर्सनल लाईफच्याही अनेक चर्चा रंगतात. सध्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या अफेअरची अफवा सगळीकडे आहे. मात्र अशातच शुभमन गिलचा एक नवा फोटो व्हायरल झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

या अभिनेत्रीसोबत दिसला शुभमन

वर्ल्डकप संपल्यानंतर आता शुभमन गिलचा एका अभिनेत्रीसोबतचा फोटो व्हायरल होताना दिसतोय. या फोटोमध्ये शुभमन अभिनेत्री अवनीत कौरसोबत दिसतोय. हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी आता या दोघांचं अफेअर असल्याची अफवा उडवली आहे. मात्र अवनीत आणि शुभमन एकत्र का आहेत, हे जाणून घेऊया. 

लंडनमध्ये सुट्ट्या एन्जॉय करतोय शुभमन

अवनीत कौर आणि शुभमन गिल लंडनच्या रस्त्यावर एकत्र फिरताना स्पॉट झाले. मात्र या फोटोमध्ये अवनीत आणि शुमन एकटे नाहीत. त्याच्यासोबत इतर अनेक मित्रही दिसतायत. या फोटोमध्ये शुभमन गिल ब्राऊन रंगाचा लाँग ब्लेझर घालून दिसतोय आणि अवनीत ऑल ब्लॅक लूकमध्ये आहे. या फोटोंमध्ये अंशुल आणि राघवही दिसत आहेत.

दोघांच्या भेटीमागे काय कारण?

अवनीतसोबत शुभमन गिल एकत्र दिसण्यामागे वेगळं कारण आहे. हे दोघे एकत्र म्युझिक व्हिडिओ करणार आहेत. त्यामुळे आता शुभमन गिल क्रिकेटसोबतच अभिनयाच्या दुनियेतही उतरणार आहे. एका म्युझिक व्हिडिओच्या माध्यमातून तो अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे.

शुभमन गिल आणि साराच्या अफेअरची चर्चा

सध्या सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्या अफेअरची चर्चा सुरू आहे. वनडे वर्ल्डकप  सामन्यांदरम्यान सारा शुभमनला सपोर्ट करताना दिसली होती. त्यानंतर मैदानात सारा तेंडुलकर आणि शुभमनच्या नावाचे नारेही लागले होते. 

सारा आणु शुभमनला Jio Plaza च्या लॉन्च इव्हेंटमध्येही स्पॉट करण्यात आलं होतं. त्यावेळी हे दोघंही एकत्र दिसले होते. हे दोघंही मीडियाला टाळताना दिसले. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.