ऑस्ट्रेलियाला सतावतेय पांड्याची भिती, पराभवानंतर स्मिथने केलंय मोठं विधान

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने तिसऱ्या वनडेतील दमदार कामगिरीसाठी हार्दिक पांड्याचे कौतुक केलेय. पांड्याने रविवारच्या वनडेत जबरदस्त अर्धशतक ठोकताना भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

Updated: Sep 25, 2017, 03:40 PM IST
ऑस्ट्रेलियाला सतावतेय पांड्याची भिती, पराभवानंतर स्मिथने केलंय मोठं विधान

इंदूर : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने तिसऱ्या वनडेतील दमदार कामगिरीसाठी हार्दिक पांड्याचे कौतुक केलेय. पांड्याने रविवारच्या वनडेत जबरदस्त अर्धशतक ठोकताना भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

भारताने जेव्हा २०६ धावांत चार विकेट गमावल्या होत्या तेव्हा पांड्याने खेळपट्टीवर टिकून राहत भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. 

या पराभवानंतर स्मिथ म्हणाला, आम्ही फलंदाजीची चांगली सुरुवात केली होती. मात्र, अखेरच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. जर आम्ही ३३०पर्यंत धावा करु शकलो असतो तर निकाल काही वेगळा असता. या विजयाचे श्रेय भारताला जाते. हार्दिकने चांगला खेळ केला. रोहित आणि जिंक्स(रहाणे) यांनीही चांगली कामगिरी केली. 

दरम्यान, स्मिथने सलामीवीर आरोन फिंचचेही कौतुक केले. फिंचने १२४ धावा ठोकल्या. मात्र त्याचे हे शतक ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देऊ शकले नाही.