मुंबई : बीसीसीआय आणि विराट कोहली यांच्यात झालेलं वाद आता सर्वांसमोर आला आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्याच्या एक दिवस आधी कोहलीने घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे त्याचे बीसीसीआयसोबतचे मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. यावेळी भारतीय कसोटी कर्णधाराने बीसीसीआयचे दावे स्पष्टपणे फेटाळले.
यानंतर कोहली आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात कोणाचा दावा खरा आणि कोण चुकीचं असे प्रश्न उपस्थित होतायत.
या घटनेनंतर टीम इंडिया गुरुवारी सकाळी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना झाली. टीम इंडियाला साऊथ आफ्रिकेसोबत 3 कसोटी सामने आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दरम्यान मुंबई एअरपोर्टवर टेस्ट कर्णधार विराट कोहली याने मुलगी वामिकासाठी खास अपील केली. ज्याचा फोटो सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आहे.
कोहली जसा टीमच्या बसमधून बाहेर पडला तिथे मीडिया उपस्थित होती. पत्नी अनुष्का शर्मा देखील त्याच्यासोबत उपस्थित होती. यावेळी विराटने मीडियाला वामिकाचे फोटो न काढण्याचं अपील केलं. कोहलीची ही परफेक्ट डॅडची इमेज प्रत्येकाच्या मनात भरली.
This has my heart pic.twitter.com/7HZIjNdjyf
— viren oswal (@OswalViren) December 16, 2021
विराट कोहलीने पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं की, दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या वनडे सिरीजसाठी उपलब्ध राहील. त्यापूर्वी बातमी आली होती की, कोहली वनडे सिरीजसाठी उपलब्ध राहू शकत नाही. मात्र पत्रकार परिषदेत भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहलीने या गोष्टीला फेटाळून लावलं आहे.