T20 World Cup 2022 Semi Final Equation: टी 20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) ग्रुप स्टेजमधील पहिल्या सामन्यापासून मोठा उलटफेर पाहायला मिळत आहे. ग्रुप स्टेजमधून दोन वेळा वर्ल्डकप जिंकलेल्या वेस्ट इंडिज संघाला आपला गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यानंतर सुपर 12 फेरीत दुबळ्या संघांची दमदार कामगिरी आणि पाऊस यामुळे उपांत्य फेरीचं गणित किचकट झालं आहे. टीम 1 गटात न्यूझीलँड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तीन संघांमध्ये उपांत्य फेरीसाठी चुरस निर्माण झाली आहे. इंग्लंडने न्यूझीलंडचा 20 धावांनी पराभव केल्याने गुणतालिकेत बदल झाला आहे. न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या तीन संघाचे समान 5 गुण आहेत. पण धावगतीच्या जोरावर न्यूझीलंड (Newzealand) अव्वल, इंग्लंड (England) दुसऱ्या, तर ऑस्ट्रेलिया (Australia) तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेच्या उपांत्य फेरीच्या आशा जर तर वर आहेत. तर आयर्लंड आणि अफगाणिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं आहे.
सुपर 12 फेरीत आयर्लंड विरुद्ध न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान आणि इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात सामना रंगणार आहे. न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी पुढच्या सामन्यात विजय मिळवला तर समान गुण होतील. पण ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडचा पराभव झाल्यास श्रीलंकेचं उपांत्य फेरीचं दार उघडणार आहे. त्यामुळे पुढचे सामने खूप अतितटीचे ठरणार आहे. नुसता विजय मिळवून चालणार नाही. तर चांगली धावगतीही राखावी लागणार आहे.
संघ | सामने | विजय | पराभव | धावगती | गुण |
न्यूझीलंड | 4 | 2 | 1 | +2.233 | 5 |
इंग्लंड | 4 | 2 | 1 | +0.547 | 5 |
ऑस्ट्रेलिया | 4 | 2 | 1 | -0.304 | 5 |
श्रीलंका | 4 | 2 | 2 | -0.457 | 4 |
आयर्लंड | 4 | 1 | 2 | -1.544 | 3 |
अफगाणिस्तान | 4 | 0 | 2 | -0.718 | 2 |
सुपर 12 फेरीतील सामने