India vs Australia : टीम इंडियाने शुक्रवारी रायपूर येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-ट्वेंटी सामन्यात (IND vs AUS 4th T20I) ऑस्ट्रेलियाचा 20 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह यजमानांनी 5 सामन्यांच्या या मालिकेवरही कब्जा मिळावलाय. मालिका विजयासह सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar yadav) कॅप्टन्सीखाली एक इतिहास देखील रचला आहे. सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 गडी गमावत 174 धावा केल्या, त्यानंतर ऑस्ट्रेलियाला 7 विकेट्सवर केवळ 154 धावाच करता आल्या. भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा खुर्दा उडवल्याचं दिसून आलंय.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयासह भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक विजय मिळवल्याचा रेकॉर्ड नावी केलाय. भारताने 213 पैकी 136 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने पाकिस्तानला मागे टाकले असून टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानने 135 विजय मिळवले होते. आता भारताच्या विजयामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. यासोबतच भारताने घरच्या मैदानावर सलग 14 वी द्विपक्षीय मालिका जिंकली.
प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये भारताने 9 विकेट्सच्या बदल्यात 174 धावा केल्या. यात सर्वोत्तम खेळी रिंकू सिंग याने केली. रिंकूने 29 चेंडूत 46 धावा केल्या. तर जितेश शर्मा यानंही 35 धावांचं योगदान दिलं. सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल 37, तर ऋतुराज गायकवाड 32 धावांची खेळी करून बाद झाले होते. त्यामुळे टीम इंजिडाने ऑस्ट्रेलियाला 175 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने दिलेल्या 175 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने चांगली सुरूवात केली होती. 40 धावांवर त्यांनी पहिली विकेट गमावली. ऑस्ट्रेलियाने नियमित अंतराने विकेट गमावल्या अन् कांगारूंचा गेम झाला. कर्णधार मॅथ्यू वेडने सर्वाधिक नाबाद 36 धावा केल्या. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर दीपक चहरने 2, बिश्नोई आणि आवेश खान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, दीपक चहर, आवेश खान आणि मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलियाचा संघ : मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), जोश फिलिप, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, आरोन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन द्वारशुइस, ख्रिस ग्रीन, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा.