Team India : टीम इंडियात या घातक गोलंदाजाची एन्ट्री होणार, टी 20 वर्ल्ड कपसाठी मोठा दावेदार

टीम इंडियात (team india) बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाजाची एन्ट्री होऊ शकतचे. हा फास्टर बॉलर बुमराहच्या जागेचा प्रमुख दावेदार आहे.

Updated: Oct 1, 2022, 09:45 PM IST
 Team India : टीम इंडियात या घातक गोलंदाजाची एन्ट्री होणार, टी 20 वर्ल्ड कपसाठी मोठा दावेदार title=

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर टी 20 वर्ल्ड कप ( T20 World Cup 2022) येऊन ठेपला आहे. याआधीच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्याचं वृत्त आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या आणि क्रिकेट चाहत्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. बुमराहच्या जागी पर्याय म्हणून शोधाशोध सुरु झाली आहे. अशातच टीम इंडियात बुमराहच्या जागी वेगवान गोलंदाजाची एन्ट्री होऊ शकतचे. हा फास्टर बॉलर बुमराहच्या जागेचा प्रमुख दावेदार आहे.  उमरान मलिकला (Umran Malik) जसप्रीत बुमराहची जागा घेऊ शकतो. (team india pacer umran malik good performece in irani cup 2022 saurashtra vs rest of india)
 
इराणी कपमध्ये रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध सौराष्ट्र  (Rest of India vs Saurashtra)यांच्यातील सामन्याच्या पहिल्याच दिवशी उमरान मलिकने धमाकेदार कामगिरी केली.  रेस्ट ऑफ इंडियाने सौराष्ट्रला पहिल्या डावात अवघ्या 98 धावांवर ऑलआऊट केलं. यामध्ये उमरानने 505 ओव्हरमध्ये 25 धावा देत  3 विकेट्स घेतल्या.  त्यामुळे उमरान बुमहारचा पर्याय म्हणून प्रबळ दावेदार आहे.  

उमरानने टीम इंडियासाठी केलेली कामगिरी

उमरानने 2022 मध्ये आयर्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. उमरानने टीम इंडियासाठी आतापर्यंत 3 टी-20 सामन्यात 12.44 च्या इकॉनॉमीने धावा देत 2 विकेट्स घेतल्या. उमरानला आयपीएल 2022 मधील नेत्रदीपक कामगिरीची पुनरावृत्ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करता आली नाही. केवळ 3 सामने खेळल्यानंतर तो टीम इंडियातून बाहेर पडला. मात्र त्याने आपल्या मारक गोलंदाजीने पुन्हा एकदा निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.