मुंबई : हैदराबादच्या टीमने कोलकाताच्या टीमचा १३ रन्सने पराभव करत आयपीएल फायनल गाठली आहे. त्यामुळे आता रविवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर चेन्नई विरुद्ध हैदराबाद या दोन टीम्समध्ये सामना रंगणार आहे.
आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत चेन्नईची टीम २ वेळा फायनलमध्ये पोहोचली आहे तर हैदराबादच्या टीमने एक वेळा फायनल गाठली आहे. चेन्नईच्या टीमने आतापर्यंत दोन आयपीएल फायनल्स जिंकल्या आहेत तर हैदराबादने एक फायनल जिंकत ट्रॉफी मिळवली आहे.
हैदराबादने २०१६ मध्ये आयपीएल फायनल जिंकली आहे तर चेन्नईने २०१० आणि २०११ मध्ये झालेली आयपीएल आपल्या नावावर केली.
चेन्नईच्या टीमचा कॅप्टन धोनीसाठी युसुफ पठानचा फॉर्म चिंतेची बाब ठरु शकतो. युसुफ पठानने आयपीएलच्या इतिसाहात एकुण ३ फायनल मॅचेस खेळल्या आहेत आणि तिन्हीमध्ये विजय मिळवला आहे.
युसुफ पठानने २००८ साली राजस्थानच्या टीमकडून खेळत आयपीएल ट्रॉफी आपल्या टीमच्या नावावर केली. त्यानंतर २०१२ आणि २०१४ मध्ये कोलकाताच्या टीमकडून खेळताना आयपीएल ट्रॉफीवर कब्जा केला.
केवळ आयपीएल फायनलमध्येच नाही तर युसुफ पठानने इतरही मॅचेसमध्ये चांगलं प्रदर्शन केलं आहे. २००८ च्या फायनल मॅचमध्ये युसुफ पठानने चेन्नईच्या टीमचा पराभव केला. त्याने राजस्थानच्या टीमकडून खेळताना उत्कृष्ट खेळ दाखवल्याने मॅन ऑफ द मॅचने त्याला गौरवण्यात आलं. युसुफने राजस्थानकडून खेळताना ३९ बॉल्समध्ये ५६ रन्सची केले. तसेच ४ ओव्हर्समध्ये २२ रन्स देत ३ विकेट्सही पटकावले होते.