चेन्नई : सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाने 2021 मधील आयपीएलची सुरुवात खराब केली आहे. आयपीएलच्या 14 सीझनमध्ये संघाने आपले पहिले दोन सामने गमावले आहेत आणि त्यामुळे आता ते पॅइंट टेबलवर 7व्या स्थानावर आहे.
14 एप्रिलला झालेल्या मॅचमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर रॉयल चॅलेंजर्सची टीम बॅटिंगसाठी आली आणि सनरायझर्स हैदराबादसमोर 150 धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर हैदराबादच्या टीमने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 143 धावा केल्या आणि कोहलीच्या संघाने 6 धावांनी सामना जिंकला.
सनरायझर्सच्या या सामन्यात कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 37 बॅालमध्ये 54 धावा फटकावल्या, पण मनीष पांडेने 39 बॅालमध्ये 38 धावा केल्या. त्यामुळे मनीष पांडेला ट्विटरवर आपल्या स्लो खेळासाठी ट्रोल केले जात आहे.
केन विल्यमसन सनरायझर्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये असावा - संजय मांजरेकर
माजी क्रिकेटर आणि कॅमेटेटर संजय मांजरेकर यांनी आपले मत मांडले की, सनरायझर्ससाठी केन विल्यमसनसारख्या खेळाडूची गरज आहे. आयपीएलमधील विल्यमसनचा खेळ अत्यंत प्रभावी आहे. आयपीएलमध्ये न्यूझीलंडच्या या खेळाडूने 53 सामन्यांत 1619 धावा केल्या आहेत. त्याने सरासरीने 39.49 च्या स्ट्राइक रेटनेही धावा केल्या आहेत.
This view is not after tonight’s result but I have always maintained this SRH team needs Kane Williamson in their playing XI no matter what. #SRHvRCB
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) April 14, 2021
आयपीएलच्या 2018 सीझनमध्ये विल्यमसनने ऑरेंज कॅपही आपल्या नावे केली आहे. त्यानंतर आयपीएलच्या 11 व्या सीझनमध्ये त्याने 735 धावा केल्या आहेत आणि 142.44 च्या सरासरीने उत्कृष्ट स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. खरंतर 2018 च्या आयपीएल हंगामात विल्यमसनचा खेळ आश्चर्यकारक होता, ज्यामुळे सनरायझर्स संघाला त्याचा खूप मोठा फायदा झाला होता.
सनरायझर्स हैदराबाद संघ याआधी आयपीएलमध्ये भाग घेतलेल्या 8 सीझनपैकी 6 सीझनमध्ये प्लेऑफ टप्प्यावर पोहोचला आहे. त्यामुळे संघ तसा खूप शक्तीशाली आहे असे म्हणण्यास हरकत नाही. फक्त योग्य खेळाडूंची गरज आहे.
सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघ चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर 17 एप्रिला बलाढ्य मुंबई इंडियन्स (एमआय) संघाविरुद्ध खेळणार आहे. त्या मॅचमध्ये काय होईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.