कुबड्या पकडून चालणाऱ्या Rishabh Pant च्या Photo वर Urvashi Rautela ची कमेंट; म्हणाली, "माझ्या..."

Urvashi Rautela Rishabh Pant Photo: मुंबई विमानतळावर काही पत्रकारांनी उर्वशीला पंतसंदर्भात विचारलं असता तिने पंतने नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडीओवर प्रतिक्रिया नोंदवली.

Updated: Feb 17, 2023, 06:29 PM IST
कुबड्या पकडून चालणाऱ्या Rishabh Pant च्या Photo वर Urvashi Rautela ची कमेंट; म्हणाली, "माझ्या..." title=
urvashi rautela rishabh pant

Urvashi Rautela Reaction on Rishabh Pant: टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि विकेटकीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या रिकव्हरी फेजमध्ये आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या भीषण कार अपघातामध्ये (Rishabh Pant Car Accident) जखमी झाल्यापासून पंत क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. या कार अपघातामध्ये पंत थोडक्यात वाचला होता. भरधाव वेगातील आलीशान गाडीला आग लागल्याने पंत जबर जखमी झाला होता. आधी त्यांच्यावर उत्तराखंडमध्ये आणि नंतर मुंबईमध्ये (Rishabh Pant Treatment Mumbai) उपचार करण्यात आले. नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये पंत कुबड्यांच्या सहाय्याने चालत असल्याचं दिसत आहे. अशातच आता अभिनेत्री उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) पंतसंदर्भात आपल्या मानातील भावना बोलू दाखल्या आहेत.

उर्वशीला कायमच पंतबद्दल विचारलं जातं

उर्वशी रौतेलाला कायमच ऋषभ पंतसंदर्भातील प्रश्न विचारले जातात. कधी पत्रकारांकडून तर कधी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून चाहत्यांकडून पंतचा उल्लेख करत प्रश्न विचारले जातात. अनेकदा उर्वशीने स्वत: इशाऱ्यांमध्ये केलेल्या विधानांमुळे तिचं नाव पंतशी जोडलं गेलं. पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार घडला आहे. उर्वशी पत्रकारांना एअरपोर्टवर दिसली. यावेळी पपाराजींनी तिला पंतसंदर्भात विचारणा केली. त्यावर तिने प्रतिक्रियाही दिली.

उर्वशीला नेमकं काय विचारण्यात आलं?

उर्वशीला मुंबई एअरपोर्टवर पाहिल्यानंतर तिची एक झलक टीपण्यासाठी पपाराजींनी तिच्याभोवती गर्दी केली. यावेळी तिला पंतसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. उर्वशीला पंतने पोस्ट केलेल्या कुबड्या घेऊन चालतानाच्या फोटोबद्दल विचारण्यात आलं. "उर्वशी मॅम इन्स्टा पाहिलं का तुम्ही?" असं एकाने उर्वशीला विचारलं. त्यावर उर्वशीने नेमक्या कोणत्या फोटोसंदर्भात बोलताय असा प्रतिप्रश्न केला. त्यावर, "अरे, ऋषभ पंत रिकव्हर होत आहे," असं म्हटलं. त्यावर उर्वशी आधी हसली आणि नंतर तिने पंतच्या या पोस्टवर प्रतिक्रिया नोंदवली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rishabh Pant (@rishabpant)

उर्वशीने दिली प्रतिक्रिया...

उर्वशीला हसताना पाहून एका पत्रकाराने, "तो (पंत) लवकरच ठीक होईल," असं म्हटलं. त्यावर उर्वशीने, "होय, तो देशाचा गर्व आहे. भारताची संपत्ती आहे तो," असं म्हटलं. "आमच्या सदिच्छा त्याच्याबरोबर आहेत," असं पत्रकार उर्वशीला सांगतो. त्यावर उर्वशी, "माझ्या शुभेच्छाही त्याच्याबरोबर आहेत," असं उत्तर देते.

काही महिन्यांपूर्वी या दोघांच्या कथित नात्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. मात्र थेट दोघांपैकी कोणीही याबद्दल भाष्य केलं नव्हतं. इशाऱ्या इशाऱ्यांमध्ये दोघांनी एकमेकांना टोमणे मारणारी विधानं मात्र सोशल मीडियावरुन केली होती.