Video: साक्षी धोनीच्या बर्थडे पार्टीत हार्दिकचं धुम्रपान

फिटनेसच्या बाबतीत सध्याचे क्रिकेटपटू जास्त जागरुक आहेत.

Updated: Nov 20, 2018, 04:33 PM IST
Video: साक्षी धोनीच्या बर्थडे पार्टीत हार्दिकचं धुम्रपान title=
फोटो सौजन्य : साक्षी धोनी इन्स्टाग्राम अकाऊंट

मुंबई : फिटनेसच्या बाबतीत सध्याचे क्रिकेटपटू जास्त जागरुक आहेत. भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली सध्या वेगन डाएट फॉलो करत आहे. पण विराट कोहलीचा सहकारी हार्दिक पांड्याचा धुम्रपान करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीच्या बर्थडे पार्टीमधल्या व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या धुम्रपान करताना दिसतोय. साक्षी धोनीच्या ३० व्या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Cake cutting #SakshiDhoni #Msdhoni

A post shared by Sakshi Singh Dhoni FC (@_sakshisingh_r) on

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी धोनीची टीममध्ये निवड झाली नाही. तर हार्दिक पांड्या दुखापतीमुळे टीमच्या बाहेर आहे. त्यामुळे हे दोघं साक्षी धोनीच्या पार्टीमध्ये एन्जॉय करताना दिसले.

भारतीय क्रिकेटपटू क्वचितच कॅमेरासमोर धुम्रपान किंवा दारूचं सेवन करताना दिसतात. अनेक क्रिकेटपटूंनी तर दारू आणि धुम्रपान तब्येतीसाठी हानिकाराक असल्याचं अभियानही चालवलं. पांड्या हा बीसीसीआयसोबत करारबद्ध झालेला खेळाडू असला तरी देशासाठीच्या अधिकृत दौऱ्यावर नव्हता तर एका वैयक्तिक कार्यक्रमात होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Kissie to Papa @zivasinghdhoni006

A post shared by Sakshi Singh Dhoni FC  (@_sakshisingh_r) on

युएईमध्ये झालेल्या आशिया कपवेळी हार्दिक पांड्या मैदानातच दुखपतग्रस्त झाला होता. यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धची टेस्ट, वनडे आणि टी-२० सीरिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० आणि टेस्ट सीरिजला पांड्याला मुकावं लागलं. आता जानेवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु होणाऱ्या वनडे सीरिजसाठी पूर्णपणे फिट व्हायचं आव्हान पांड्यापुढे असणार आहे. ६० दिवसानंतर पांड्यानं आता सरावाला सुरुवात केली आहे.