विराटने मितालीला शुभेच्छा दिल्या पण केली मोठी चूक

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय महिला टीमची कर्णधार मिताली राजला विश्व रेकॉर्ड बनवल्यामुळे शुभेच्छा दिल्या.

Updated: Jul 13, 2017, 04:51 PM IST
विराटने मितालीला शुभेच्छा दिल्या पण केली मोठी चूक title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय महिला टीमची कर्णधार मिताली राजला विश्व रेकॉर्ड बनवल्यामुळे शुभेच्छा दिल्या. मितालीला शुभेच्छा देतांना विराटने म्हटलं की,  'भारतीय क्रिकेटचा हा शानदार क्षण आहे. आज महिला वनडे क्रिकेट इतिहासात मिताली सर्वाधिक रन बनवणारी क्रिकेटर बनली आहे. चॅम्पियन प्रदर्शन.' पण शुभेच्छा देतांना विराटने एक मोठी चूक केली.

विराटने मितालीला शुभेच्छा दिल्या पण फोटो मात्र दुसऱ्याच खेळाडूचा शेअर केला. मग क्रिकेट फॅन्सने त्याची ही चूक लगेच पकडली. एकाने त्यावर कमेंट केली की, कर्णधार साहेब फोटो मितालीचा नाही तर पुनम राऊतचा आहे.' तर अनेकांना मितालीला न ओळखल्याने विराटवर टीका देखील केली.

विराटला त्याची चूक कळाली आणि त्याने ती पोस्ट लगेच डिलीट करुन टाकली. मिताली सर्वाधिक धावा काढणारी क्रिकेटर बनली आहे. मितालीने आतापर्यंत १८३ सामन्यात १६४ इनिंग खेळत ४२ वेळा नाबाद राहत ६०१५ धावा काढल्या आहेत. यात ४९ अर्धशतकं आणि पाच शतके झळकावली आहेत. तीने ५१.८१ च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. तिची वन डेमधील सर्वाधिक धावसंख्या ११४ आहे.