सचिनचा 'हा' महारेकॉर्ड मोडण्यापासून विराट फक्त एक शतक दूर, दुसऱ्या टेस्टमध्ये रचणार इतिहास?

IND VS AUS Test : विराटने पुढच्या टेस्टमध्ये पुन्हा एकदा शतक ठोकले तर तो मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडू शकतो. तसेच बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये मोठा इतिहास रचू शकतो. 

पुजा पवार | Updated: Dec 3, 2024, 04:31 PM IST
सचिनचा 'हा' महारेकॉर्ड मोडण्यापासून विराट फक्त एक शतक दूर, दुसऱ्या टेस्टमध्ये रचणार इतिहास? title=
(Photo Credit : Social Media)

Border Gavaskar Trophy : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी सुरु असून यासाठी संपूर्ण भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पर्थ येथे झालेला पहिला टेस्ट सामना हा भारताने जिंकून 1-0 ने सीरिजमध्ये आघाडी घेतली. त्यानंतर आता दुसरा टेस्ट सामना हा 6 डिसेंबर पासून सुरु होणार आहे. पर्थ टेस्टमध्ये टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली याने भारतासाठी दणदणीत शतक ठोकले. ज्यामुळे टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 500 हुन अधिक धावांचे आव्हान दिले होते. जर विराटने पुढच्या टेस्टमध्ये पुन्हा एकदा शतक ठोकले तर तो मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) रेकॉर्ड मोडू शकतो. तसेच बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये मोठा इतिहास रचू शकतो. 

1996 पासून खेळली जातेय बॉर्डर गावसकर ट्रॉफी : 

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मागील अनेक वर्षांपासून टेस्ट सीरिज खेळवली जाते. मात्र 1996 रोजी या सीरिजला बॉर्डर गावसकर ट्रॉफी हे नाव देण्यात आलं. बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये सर्वात जास्त शतक लगावण्याचा रेकॉर्ड हा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये 65 इनिंग्स खेळून त्यात 9 शतक लगावली. तर विराटने पर्थ टेस्टमध्ये शतक झळकावून सचिनच्या या विक्रमाशी बरोबरी केली होती. पर्थ टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना अवघ्या 5 धावा करून बाद झाला होता. त्यावरून विराटला सोशल मीडियावर मोठ्या ट्रोलिंगला समोर जावं लागलं होतं. मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये विराटने ही कसर भरून काढली आणि थेट नाबाद शतक ठोकलं. विराटचं टेस्ट क्रिकेटमधील हे 30 वं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमधील 81 वं शतक ठरलं. हे शतक विराटने 143 बॉलमध्ये पूर्ण केलं दरम्यान त्याने 8 चौकार आणि 2 षटकार ठोकले होते. 

हेही वाचा : जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; कमाईच्या बाबतीत सचिन, धोनी, कोहलीलाही टाकतो मागे, 22 व्या वर्षी झाला निवृत्त

विराटने रेकॉर्डसमध्ये केली सचिनची बरोबरी : 

विराट कोहलीने बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये एकूण 44  इनिंगमध्ये 9 शतक झळकावली आहेत. जर बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या उर्वरित सामन्यांमध्ये विराटने अजून एक शतक झळकावले तर तो सचिनच्या पुढे निघून जाईल. विराट हा केवळ शतकच झळकावणार नाही तर सचिनच्या तुलनेत कमी इनिंगमध्ये 10 शतक करणारा खेळाडू ठरेल. सध्या विराट आणि सचिन या दोघांच्या नावावर बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये प्रत्येकी 9 शतक आहेत. तर रिकी पॉन्टिंगच्या नावावर 51 इनिंगमध्ये 8 शतक लागवण्याचा विक्रम आहे. तर स्टीव्ह स्मिथने देखील बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये 37 इनिंगमध्ये 8 शतक झळकावली आहेत. 

बॉर्डर गावसकर ट्रॉफीचं वेळापत्रक : 

पहिली  टेस्‍ट: 22 ते  26 नोव्हेंबर 
दुसरी टेस्‍ट: 6 ते 10 डिसेंबर 
तिसरी टेस्‍ट: 14 ते 18 डिसेंबर 
चौथी टेस्‍ट: 26 ते 30 डिसेंबर 
पाचवी टेस्‍ट: 3 ते 7 जानेवारी