Virat Kohli Vs Naveen Ul Haq : लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यापूर्वी त्यानेरॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहली याचा सोबत झालेल्या बाचाबाचीमुळे चाहत्यांचा लक्ष्य बनला होता. यानंतर तो सोशल मीडियावर चाहते त्याला ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाही आहे. अशात शनिवारी झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकता किंग राइयड्सच्या (lucknow super giants Kolkata Knight Riders) मॅच दरम्यान त्याने भरमैदानात पुन्हा असं काही केलं की तो चाहत्यांचा निशाण्यावर आला आहे. (IPL 2023 LSG vs KKR)
कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात नवीन बॉलिंग करताना चाहते कोहलीच्या नावाची घोषणा करत होते. तेव्हा नवीन असं कृत्य केलं की, चाहते नाराज झाले आहेत. (virat kohli vs naveen ul haq ipl LSG vs KKR naveen ul haq shows silence gardens crowd video viral on Social media Google Trending Now)
झालं असं की, रवी बिश्नोईने रहमानउल्ला गुरबाजचा आऊट करण्यासाठी बॉल पकडला. त्यावेळी नवीनने प्रेक्षकांच्या दिशेने तोंडावर बोट ठेवून शांत राहण्याचा इशारा केला. नवीनच्या या कृत्यामुळे तो पुन्हा एकदा चाहत्यांचा निशाण्यावर आला आहे.
The slower ball
The catch
The celebrationIt's all happening in #KKRvLSG #TATAIPL #IPLonJioCinema #EveryGameMatters pic.twitter.com/YGVwIKHWbZ
— JioCinema (@JioCinema) May 20, 2023
आयपीएलच्या एलएसजी आणि आरसीबी यांच्यामधील सामन्यात विराट कोहली अतिशय फॉर्ममध्ये होता. यादरम्यान विराट आणि नवीन यांच्यामध्ये बाचाबाची झाली. विराट आणि नवीन मैदानात भिडले. त्यानंतर अमित मिश्रा आणि पंच यांनी हस्तक्षेप केला. पण नंतर या वादात गौतम गंभीरने उडी घेतली. गंभीर आणि विराटमधील वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणी तिन्ही खेळाडूंना बीसीसीआयने दंडही ठोकला.
That roar of " kohli kohli " from Eden gardens while Naveen was bowling, same happened in Hyderabad and chennai.
“ you get what you deserve that's how it should be and that's how it goes " ~ Naveen ul haq pic.twitter.com/lh7SA4RCrx— Yashvi. (@BreatheKohli) May 20, 2023
जिंकता जिंकता कोलकाता नाईट रायडर्स एका रनने हरली. लखनऊ सुपर जायंट्सने या विजयासह प्लेऑफ गाठला आहे. प्लेऑफ गाठणारा लखनऊ सुपर जायंट्स तिसरा संघ आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात कोलकाताने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला होता. लखनऊने कोलकातासमोर 176 रन्सचं आव्हान ठेवलं. पण कोलकात्याला केवळ 175 रन्स गाठता आले आणि त्यासोबत त्यांनी एका रनने सामना हरला.
Naveen Ul Haq shows silence gesture to the Eden Gardens crowd. pic.twitter.com/8znGrQLT1n
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 20, 2023