IPL 2025: आयपीएल रिटेन्शन लिस्ट आज किती वाजता जाहीर होईल? जाणून घ्या तुम्ही कुठे पाहायला मिळेल

IPL Retention How to Watch Live: आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी, सर्व 10 फ्रँचायझींना कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करायची आहे, ज्याची अंतिम तारीख आज (31 ऑक्टोबर) आहे. 

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 31, 2024, 12:28 PM IST
IPL 2025: आयपीएल रिटेन्शन लिस्ट आज किती वाजता जाहीर होईल? जाणून घ्या तुम्ही कुठे पाहायला मिळेल  title=

IPL Retention Live Streaming Details: आयपीएल 2025 च्या मेगा लिलावा आता काही तासातच सुरु होणार आहे. लिलावापूर्वी सर्व 10 फ्रँचायझी कोणत्या खेळाडूंना कायम ठेवणार (रिटेन करणार) आहेत हे जाणून घेण्यासाठी आयपीएल चाहते उत्सुक आहेत. सर्व फ्रँचायझींनी 31 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांची रिटेन्शनसहन यादी प्रसिद्ध करावी लागेल. ऋषभ पंत, केएल राहुलसारख्या स्टार क्रिकेटपटूंचे काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. सगळीकडे त्यांच्या नावाची चर्चा आहे. चला जाणून घेऊयात की तुम्ही आयपीएल रिटेन्शन लाईव्ह कुठे पाहू शकता. 

आयपीएल 2025 रिटेन्शनची अंतिम मुदत कधी आहे?

आयपीएल 2025 रिटेन्शन अंतिम मुदत 31 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:00 आहे.

कोणते टीव्ही चॅनल आयपीएल 2025 रिटेन्शन प्रसारित करेल?

आयपीएल 2025 रिटेन्शन भारतात स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स18 नेटवर्कवर थेट प्रसारित केले जाईल. 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:00 वाजता अधिकृत प्रसारण सुरू होईल.

हे ही वाचा: मेगा-लिलावापूर्वी एका निर्णयाने मुंबई इंडियन्समध्ये खळबळ, 'या' व्यक्तीचे झाले पुनरागमन

आयपीएल 2025 रिटेन्शनचे लाइव्ह स्ट्रीमिंग ओटीटीवर कसे पहावे?

आयपीएल 2025 रिटेन्शनचे लाइव्ह स्ट्रीमिंग 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:30 पासून JioCinema ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

रिटेन्शन नियमांमध्ये बदल

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनेही यंदा रिटेन्शन नियम अपडेट केले आहेत. संघ आता जास्तीत जास्त सहा खेळाडू ठेवू शकतात, ज्यामध्ये कमाल पाच कॅप्ड आणि दोन अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश असेल. एका विशेष नियमानुसार, कॅप्ड खेळाडूंनी गेल्या पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नसेल तर त्यांना अनकॅप्ड म्हणून कायम ठेवता येते. या नियमामुळे महेंद्रसिंग धोनी सीएसकेमध्ये राहण्याची पूर्ण आशा आहे.

हे ही वाचा: IPLमध्ये विकले गेलेले सर्वात महागडे पाच भारतीय खेळाडू कोणते? जाणून घ्या

रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरवर लक्ष 

रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर या स्टार भारतीय क्रिकेटपटूंबद्दल चाहत्यांना खूप उत्सुकता आहे आणि त्यांच्यासोबत काय होणार आहे. फ्रँचायझी कायम ठेवल्या आहेत की लिलावात प्रवेश करणार आहेत?

ऑक्शन पर्स वाढला 

नवीन नियमांव्यतिरिक्त, ऑक्शन पर्समध्ये देखील 20% वाढ करण्यात आली आहे. आता संघांकडे खर्च करण्यासाठी 120 कोटी रुपये आहेत, तर पगाराची मर्यादा 146 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. लिलावापूर्वी 31 ऑक्टोबरला जाहीर होणाऱ्या रिटेन्शन लिस्टवर तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा खिळल्या असून, या घोषणेने संघांच्या भविष्यातील रणनीतीबाबत बरेच काही कळणार आहे.