Virat Kohli : वनडे क्रिकेटचा किंग कोण? सचिन की विराट? सौरव गांगुली म्हणतो...

Sourav Ganguly On Virat Kohli: श्रीलंकेविरुद्ध टी-ट्वेंटीमध्ये शतक आणि त्यानंतर वनडे सामन्यात शतक (Virat Kohli Century) ठोकल्यानंतर रनमशिन पुन्हा चालू लागली आहे. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतकं झळकावली आहेत. 

Updated: Jan 12, 2023, 07:56 PM IST
Virat Kohli : वनडे क्रिकेटचा किंग कोण? सचिन की विराट? सौरव गांगुली म्हणतो... title=
Sachin Virat Sourav

Sachin Tendulkar vs Virat Kohli: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा फॉर्ममध्ये आला. विराट ज्यावेळी फॉर्ममध्ये नव्हता, त्यावेळी त्याच्यावर सर्वबाजूने टीका होत होती. विराट आता संपला... त्याला सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) होता येणार नाही, अशी चर्चा क्रिडाविश्वात होत होती. त्यावेळी विराटने खणखणीत शतक ठोकलं आणि 'किंग इस बॅक' हे दाखवून दिलं. श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) खेळल्या जात असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात विराटने सचिनचा रेकॉर्ड मोडला. त्यामुळे आता विराट कमी वयात सचिनला मागे टाकणार का?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. अशातच आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि  टीम इंडियाचा माजी खेळाडू सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने मोठं वक्तव्य केलंय. (Former BCCI President Sourav Ganguly spill beans on Sachin Tendulkar vs Virat Kohli debate)

श्रीलंकेविरुद्ध टी-ट्वेंटीमध्ये शतक आणि त्यानंतर वनडे सामन्यात शतक (Virat Kohli Century) ठोकल्यानंतर रनमशिन पुन्हा चालू लागली आहे. सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतकं झळकावली आहेत. विराट कोहलीने वनडेमध्ये आतापर्यंत 45 शतकं झळकावली आहेत. त्यामुळे आता लवकरच विराट सचिनचा रेकॉर्ड (Sachin Tendulkar Record) मोडीस काढू शकतो. वेगवेगळ्या पातळीवर पाहिलं तर या दोन खेळाडूंमध्ये फारसा फरक राहिलेला नाही. त्यावर बोलताना सौरव गांगुलीला (Former BCCI President Sourav Ganguly) प्रश्न विचारण्यात आला होता.

सौरव गांगुली म्हणतो...

सचिन की विराट? या प्रश्नावर बोलताना सौरव गांगुलीने प्रश्न फेटाळून लावला. या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे, असं सौरव म्हणाला आहे. विराट हा खूप चांगला खेळाडू आहे. त्याने एकापैक्षा एक चांगल्या इनिंग खेळल्या आहेत. 45 शतकं उगाच बनत नाही. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. त्याच्याकडे खास टॅलेंट आहे. एक काळ होता. तो ज्यावेळी खास कामगिरी करत नव्हता. मात्र, तो त्यावेळी आणि आता खास आहे, असं सौरव गांगुली (Sourav Ganguly On Virat Kohli) म्हणाला.

आणखी वाचा - Virat Kohli Century: अनस्टॉपेबल 'कोहली'... श्रीलंकेविरुद्ध वादळी शतक; सचिनच्या बड्या रेकॉर्डची बरोबरी!

दरम्यान, कोहलीची मायदेशात 19 एकदिवसीय शतकं होती, तर सचिन तेंडुलकरने भारतात 20 शतकं झळकावली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात सेंच्युरी केल्याने कोहलीने सचिन तेंडूलकरच्या आणखी एका रेकॉर्डची बरोबरी केली आहे. तसेच श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक शतकं करण्याचा सचिनचा विक्रम मोडत विराटने नवा विक्रम नावावर केलाय. त्यामुळे सध्या कोहलीच्या विराट पराक्रमाची चर्चा होताना दिसते.