Dinesh Karthik On Indian Team: विराट कोहली (Virat Kohli) म्हणजे जगभरातील तरुण क्रिकेटप्रेमींच्या गळातील ताईत...जगभरातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटर्सच्या यादीत विराट कोहलीचं नाव नोंदवलं गेलंय. वनडे इंटरनॅशनल (One Day International), टी-ट्वेंटी क्रिकेट (T20 Cricket) आणि कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) कोहलीचं नाव विराट अक्षरात लिहिलं गेलंय. मागील तीन वर्षापासून विराटची कामगिरी चांगली झाली नव्हती, पण म्हणतात ना... फॉर्म इस टेम्पररी बट क्लास इस पर्मनंट, विराट पुन्हा आला... पुन्हा आपल्या स्टाईलमध्ये खेळ दाखवत 'विराट संपला नाही', अशी डरकाळी त्यानं फोडली.
विराटमध्ये अजून खूप क्रिकेट बाकी आहे, हे सर्वांना माहिती आहे. मात्र, विराट कोहली आता ब्रँड (Virat Kohli) झालाय. त्यामुळे आता पुढचा विराट कोहली कोण?, असा सवाल विचारला जातोय. अशातच आता भारताचा फिनिशर आणि विकेटकिपर फलंदाज दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) मोठं वक्तव्य केलंय.
श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) विराट कोहलीसारखे व्हायला हवं. त्यामुळे तुम्हाला 120-130 धावा केल्यानंतर नाबाद राहावं लागेल. कोहलीने (Virat Kohli) गेल्या अनेक वर्षांत नाव आणि प्रसिद्धी मिळवली आहे. श्रेयस अय्यरने बांगलादेशविरुद्ध शानदार खेळी केली. त्यानं भारताला अशा स्थितीत नेलं की जिथं टीम इंडिया (Team India) जिंकू शकते, असं डीके (DK) म्हणाला आहे.
मला वाटतं की, श्रेयस अय्यरने ज्याप्रकारे मागील काही दिवसात प्रदर्शन केलंय. त्यावरून तुम्ही त्याचा आत्मविश्वास पाहू शकता. यावर्षी त्याने 700 हून अधिक धावा केल्या आहेत. तो पहिल्या विकेटवर सेट करण्याचा प्रयत्न करतो. श्रेयस अय्यर हा फिरकीपटूविरुद्ध उत्तम फलंदाज आहे. तो प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करत आहे, असं दिनेश कार्तिक (DK) म्हणाला आहे.
आणखी वाचा - पैलवानांनो तयारीला लागा, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तारीख जाहीर!
दरम्यान, बांग्लादेशविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत (India tour of Bangladesh, 2022) टीम इंडिया 2-0 ने पराभवाच्या उंभरठ्यावर आहे. तिसरा सामना येत्या 10 तारखेला खेळला जाणार आहे. त्यामुळे आता अखेरचा सामना (Bangladesh vs India, 3rd ODI) जिंकून मालिकेत टीम इंडियाला लाज राखवी लागणार आहे. त्यामुळे आता अखेरच्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या कामगिरीवर सर्वांच लक्ष लागलंय.