कोण होणार भारतीय संघाचे नवे कोच? या दिग्गज खेळाडूचं नाव चर्चेत

भारतीय क्रिकेट संघाला मिळणार नवा कोच...

Updated: Sep 30, 2021, 10:17 PM IST
कोण होणार भारतीय संघाचे नवे कोच? या दिग्गज खेळाडूचं नाव चर्चेत title=

मुंबई : या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात युएई आणि ओमानमध्ये टी-20 विश्वचषक खेळला जाईल. या मोठ्या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर बीसीसीआयच्या एका निर्णयाने सर्वांना आश्चर्य वाटले. खरं तर, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचा मेंटर बनवण्यात आलं आहे. त्याचबरोबर रवी शास्त्रीही विश्वचषकानंतर प्रशिक्षकपद सोडणार आहे.

टीम इंडियाला मिळणार नवीन प्रशिक्षक

बीसीसीआयचे माजी मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड हे मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेचे प्रबळ दावेदार असल्याचे सुचवले आहे. शास्त्री 2017 पासून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत आणि त्यांच्या प्रशिक्षकाचा कार्यकाळ संपत असल्याने आयसीसी टी-20 विश्वचषकानंतर नवा प्रशिक्षक कोण होणार याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे.

प्रसाद एका वृत्तवाहिनीवर म्हणाले की, माझ्या मनात ही भावना आहे. रवी भाई नंतरच्या काळात मला माझ्या सहकाऱ्यांनी एमएसकडे एक मार्गदर्शक म्हणून आणि राहुल द्रविडकडे प्रशिक्षक म्हणून निश्चितपणे पाहण्याचे आव्हान दिले होते. ते म्हणाले, 'जेव्हा मी आयपीएल दरम्यान कॉमेंट्री करत होतो, तेव्हा मी माझ्या सहकारी समालोचकांसोबत ही चर्चा केली. रवीभाईनंतर राहुलला ज्याप्रकारे खेळाबद्दल अनुभव आहे, तो भारतीय संघासाठी खूप मोलाचा ठरणार आहे, अशी माझी भावना आहे.