Mohammad Shami On Hardik Pandya : गुजरात टायटन्सचा माजी कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) खेळताना दिसणार आहे. पलटणने हार्दिकला खरेदी करून थेट कॅप्टन्सीची जबाबदारी दिल्याने आता हार्दिकवर राग व्यक्त केला जातोय. सोशल मीडियावर हार्दिक आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध नाराजी जाहीर केली जातीये. त्यामुळे सोशल मीडियावर हार्दिकची इमेज व्हिलन म्हणून समोर आली आहे. अशातच एक व्हिडीओ समोर आला असून त्यात मोहम्मद शमीचं (Mohammad Shami) वक्तव्य दाखवण्यात आलं आहे.
काय म्हणतो Mohammad Shami ?
कोणत्याही सामन्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये वातावरण तापलं होतं का? असा सवाल शमीला केला होता. त्यावर शमीने हार्दिकच्या संतापावर भाष्य केलं. अशीच एकच घटना झाली होती. जेव्हा हार्दिक माझ्यावर भर सामन्यात भडकला होता. त्यावेळी त्याने अश्लिल शब्द देखील माझ्यामते वापरले होते. त्यावेळी मी त्याला खडसावलं. तू मला अशा प्रकारे बोलू शकत नाहीस, मग मी पण बोलणारा माणूस आहे. त्यामुळे उगाच आपल्यात भांडणं होतील. त्यामुळे ड्रेसिंग रुममधील वातावरण खराब होईल. त्यावेळी मॅनेजमेंट देखील माझ्यासोबत होतं, असं शमी म्हणतो.
पाहा Video
मी त्याला तंबी दिल्यानंतर त्याला चूक लक्षात आली. तो माझ्याजवळ आला अन् त्याने माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. नाही शमी भाई, तू तर मला ओळखतो. मी असं करत नाही. ते मैदानात चूकन झालं. तू देईल ती शिक्षा मी स्विकारेल, असं हार्दिक मला म्हणाला होता. त्यानंतर त्याने पुन्हा असं कधीच केलं नाही, असं शमीने गुजरात टायटन्सच्या मुलाखतीत सांगितलं होतं.
पाहा संपूर्ण मुलाखत
दरम्यान, गुजरात टायटन्स विरूद्ध लखनऊ सुपर जायंट सामन्यादरम्यान एक घटना झाली होती. मोहम्मद शमीनं बाऊंड्री लाईनवर चूक केली. त्यावेळी हार्दिकला संताप अनावर झाला होता. जिथं एक रन पाहिजे, तिथं दोन धावा निघाल्या. त्यावेळी हार्दिक शमीवर भडकला होता. त्यावेळी भर मैदानात हार्दिकने शमीवर राग व्यक्त केला होता.