IPL 2024 Delhi Capitals : आयपीएलच्या 17 व्या हंगामाची सुरूवात (IPL 2024) होण्यासाठी आता फक्त दीड महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. यंदाची आयपीएल दोन टप्प्यात होणार असून त्याची सुरूवात 22 मार्च रोजी होणार असल्याचं आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचलीये. अशातच आता दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) संघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यंदाच्या हंगामात स्टार प्लेयर ऋषभ पंत (Rishabh Pant) खेळणार असल्याची माहिती दिल्ली संघाच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. मात्र, यानंतर देखील दिल्लीच्या खेम्यात कभी खुशी कभी गम असा माहोल तयार झाल्याचं पहायला मिळतंय.
एनसीए अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाल्यानंतर ऋषभ पंत तब्बल 21 महिन्यानंतर दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. ऋषभ यंदाच्या आयपीएलमध्ये फक्त फलंदाज म्हणून खेळेल. त्याचबरोबर तो टीमची कॅप्टन्सी देखील करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ऋषभ यंदाच्या आयपीएलमध्ये विकेटकिपिंग करणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.
Rishabh Pant at the Alur Cricket Stadium.
- It's time for the Rishabh Pant comeback...!!! pic.twitter.com/YUuqMgY6Dk
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 20, 2024
ऋषभ पंतने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 98 सामने खेळले असून 2838 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर एक शतक आणि 15 अर्धशतके आहेत.
अपघातावर ऋषभ काय म्हणतो?
नुकतीच ऋषभ पंतने मुलाखत दिली होती. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला असं वाटलं होतं की या जगातील माझा वेळ संपलाय. अपघातादरम्यान झालेल्या दुखापतींबद्दल मला माहिती होती, परंतु मी नशीबवान होतो. कारण त्या अधिक गंभीर असू शकल्या असत्या, असं ऋषभ पंत म्हणाला होता. रिकव्हरीचा वेळ कमी करण्यासाठी मला कठोर परिश्रम करावं लागतील याची मला जाणीव होती, असंही ऋषभ पंतने म्हटलं होतं.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ : अभिषेक पोरेल, एनरिक नॉर्टजे, अक्षर पटेल, डेव्हिड वॉर्नर, इशांत शर्मा, कुलदीप यादव, ललित यादव, लुंगीसानी एनगिडी, मिचेल मार्श, मुकेश कुमार, प्रवीण दुबे, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, सय्यद खलील अहमद, विकी ओस्तवाल, यश धुळ.
नवे खेळाडू : हॅरी ब्रूक, ट्रिस्टन स्टब्स, रिकी भुई, कुमार कुशाग्रा, रसीख दार, झ्ये रिचर्डसन, सुमित कुमार, शाई होप, स्वस्तिक छिकारा.