मॅनचेस्टर :
LIVE UPDATE
- युझवेंद्र चहल ५ रनवर आऊट, सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का
- टीम इंडियाची नववी विकेट, भुवनेश्वर कुमार शून्य रनवर आऊट
- टीम इंडियाची आठवी विकेट, धोनी ५० रनवर आऊट
-टीम इंडियाची सातवी विकेट, रवींद्र जडेजा आऊट
- टीम इंडियाची सहावी विकेट, हार्दिक पांड्या ३२ रन करून आऊट
- टीम इंडियाला पाचवा धक्का, ऋषभ पंत ३२ रन करुन आऊट
-२४० रनचा पाठलाग करताना टीम इंडियाला सुरुवातीला चार धक्के
- दिनेश कार्तिक ६ रन करून आऊट
- रोहित शर्मा १ रनवर माघारी
- विराट कोहली १ रनवर आऊट
- केएल राहुलची १ रनवर विकेट
वर्ल्ड कपची सेमी फायनल जिंकण्यासाठी टीम इंडियाला २४० रनची गरज आहे. काल पावसामुळे सामना रद्द झाल्यानंतर आज राखीव दिवशी न्यूझीलंडने दिवसाची सुरुवात ४६.१ ओव्हरमध्ये २११/५ एवढ्या स्कोअरवर केली. पण रवींद्र जडेजाच्या जबरदस्त फिल्डिंगमुळे न्यूझीलंडला दोन धक्के बसले. जडेजाने पहिले रॉस टेलरला रन आऊट केलं आणि मग बाऊंड्री लाईनवर टॉम लेथमचा शानदार कॅच पकडला. टेलर ७४ रनवर माघारी परतला. भारतीय बॉलरनी आज फक्त एक फोर दिली. न्यूझीलंडने ५० ओव्हरमध्ये २३९/८ एवढा स्कोअर केला.
भारताकडून भुवनेश्वर कुमारने ३ विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि युझवेंद्र चहलला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. रॉस टेलरशिवाय न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने अर्धशतक केलं. केन विलियमसन ६७ रन करून आऊट झाला.