बर्मिंघम : बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाने टॉस जिंकला आहे. या मॅचमध्ये विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाने दोन बदल केले आहेत. केदार जाधवच्या ऐवजी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे. तर कुलदीप यादवऐवजी भुवनेश्वर कुमारला संधी देण्यात आली आहे.
इंग्लंडविरुद्ध बर्मिंघमवर झालेल्या मॅचच्याच खेळपट्टीवर हा सामना खेळवण्यात येत आहे, त्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये रन करणं अवघड जाईल, या कारणासाठी पहिले बॅटिंग घेत असल्याचं विराटने सांगितलं. तसंच बर्मिंघमच्या मैदानातली एका बाजूची खेळपट्टी ही फक्त ५९ मीटर असल्यामुळे दोन स्पिनर खेळवले नाहीत, असं विराट टॉसवेळी म्हणाला.
इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला. या वर्ल्ड कपमधला टीम इंडियाचा हा पहिलाच पराभव होता. या मॅचमध्ये शेवटच्या काही ओव्हरमध्ये फटकेबाजीची गरज असताना धोनी आणि केदार जाधवने एक-एक रन काढण्यात समाधान मानलं. यानंतर केदार आणि धोनीवर टीका झाली. या खेळीबद्दल दोघांशी बसून बोलू, असं विराट म्हणाला होता.
Captain @imVkohli wins the toss and elects to bat first against Bangladesh.#CWC19 pic.twitter.com/EVvtaPZKjr
— BCCI (@BCCI) July 2, 2019
बांगलादेशविरुद्धच्या मॅचमध्ये विजय मिळवून टीम इंडियाला सेमी फायनल गाठण्याची संधी आहे. तर दुसरीकडे बांगलादेशला सेमी फायनलचं आव्हान कायम ठेवायचं असेल, तर हा सामना जिंकावाच लागणार आहे.
लोकेश राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, एमएस धोनी , हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, युजेंद्र चहल, जसप्रित बुमराह
तमीम इक्बाल, लिटोन दास, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम , सौम्य सरकार, मोसद्देक हुसेन, सबीर रहमान, मोहम्मद सैफुद्दीन, मशरफी मुर्तझा, रुबेल हुसेन, मुस्तफिजूर रहमान