WPL 2023 : आज होणार स्पर्धेतील पहिला डबल हेडर, स्मृती मानधनासह हे खेळाडू गाजविणार मैदान

WPL 2023 : शनिवारी मोठ्या धुमधडाक्यात पहिल्या वहिल्या महिला प्रीमियर लिगची सुरूवात झाली. पहिल्याच सामन्यात Mumbai Indians ने विजयाने झाली. मुंबईच्या पोरांनी गुजरात जाएंट्सचा धुव्वा उडवला. आज या स्पर्धेत डबल धमाका आहे. कारण आज दोन मॅच खेळले जाणार आहे. 

Updated: Mar 5, 2023, 02:45 PM IST
WPL 2023 : आज होणार स्पर्धेतील पहिला डबल हेडर, स्मृती मानधनासह हे खेळाडू गाजविणार मैदान title=
wpl 2023 RCB vs DC and gujarat giants vs up warriorz live streaming playing 11 match Smriti Mandhana sports news in marathi

WPL 2023 : मुंबईच्या नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर सुरु झालेल्या इतिहासिक महिला प्रीमियर लीगला मोठ्या उत्साहात सुरु झाली. शनिवारी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians)गुजरात जाएंट्सच्या महिलांना (WPL 2023) कासावीस करुन सोडलं. 208 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातच्या महिलांनी मुंबईच्या पोरांनी धुव्वा उडवला. आजचा रविवार (WPL 2023 Todays Matches) हा क्रिकेटप्रेमींसाठी डबल धमाका असणार आहे. कारण आज दोन संघ एकमेकांशी लढणार आहेत. (wpl 2023 RCB vs DC and gujarat giants vs up warriorz live streaming playing 11 match Smriti Mandhana sports news in marathi) 

WPL 2023 पहिला सामना कोणामध्ये?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC)

WPL 2023 पहिला सामन्याची वेळ? (WPL 2023 RCB vs DC)

दुपारी 3.30 वाजता 

RCB vs DC, WPL 2023 : दिल्ली संघाचं नेतृत्तव क्रिकेटची दिग्गज महिला कर्णधार मेग लॅनिंग करणार आहे. तर तिला टक्कर देणार आहे बंगळुरुमधून स्मृती मानधना. मेगच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आहे. त्यामुळे आजची ही मॅच प्रत्येक क्रिकेटप्रेमींसाठी रोमांचिक असणार आहे.  हा सामना हा सामना मुंबईच्या ब्रेब्रॉन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ 

स्मृती मानधना (क), डॅन व्हॅन निकर्क, एलिस पेरी, हीदर नाइट, सोफी डिव्हाईन, एरिन बर्न्स, ऋचा घोष (डब्ल्यू), मेगन शुट, रेणुका ठाकूर सिंग, दिशा कासट, कोमल झांझाड, कनिका आहुजा, श्रेयंका पाटील, प्रीती बोस, सहाना पवार, पूनम खेमनार, आशा शोभना, इंद्राणी रॉय

दिल्ली कॅपिटल्स संघ

तान्या भाटिया (विकेटकीपर), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, मेग लॅनिंग (क), एलिस कॅप्सी, लॉरा हॅरिस, जसिया अख्तर, शिखा पांडे, मारिझान कॅप, स्नेहा दीप्ती, राधा यादव, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, जेस जोनासेन, टिटा साधू, अपर्णा मंडल, मिन्नू मणी, तारा नॉरिस

WPL 2023 दुसरा सामना कोणामध्ये? 

गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स (Up Warriorz vs Gujarat Giants )

WPL 2023 दुसऱ्या सामन्याची वेळ? (WPL 2023, UP vs GG)

संध्याकाळी 7:30 वाजता 

यूपी वॉरियर्स संघ विरुद्ध गुजरात जायंट्स संघ - महिला प्रीमियर लीगमधील दुसरा सामना हा डीवाय पाटील स्टेडियमवर रंगणार आहे. गुजरात जायंट्स संघाचा हा दुसरा सामना आहे. शनिवारी मुंबईसोबत झालेल्या मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे पहिला विजय मिळवण्यासाठी हे दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. 

यूपी वॉरियर्स संघ 

अ‍ॅलिसा हिली (w/c), किरण नवगिरे, देविका वैद्य, सिमरन शेख, दीप्ती शर्मा, ताहलिया मॅकग्रा, पार्श्वी चोप्रा, श्वेता सेहरावत, सोप्पधंडी यशश्री, सोफी एक्लेस्टोन, शबनम इस्माईल, राजेश्वरी गायकवाड, लॅरेस बेणे, गूरसेन , अंजली सरवाणी, लक्ष्मी यादव

गुजरात जायंट्स संघ 

किम गर्थ, दयालन हेमलता, सबिनेनी मेघना, अॅश्ले गार्डनर, सोफिया डंकले, बेथ मूनी (डब्ल्यू/सी), हरलीन देओल, हर्ले गाला, अॅनाबेल सदरलँड, सुषमा वर्मा, स्नेह राणा, जॉर्जिया वेरेहम, मानसी जोशी, मोनिका पटेल , अश्विनी कुमारी, शबनम एमडी शकील, पारुनिका सिसोदिया, तनुजा कंवर