मॅन्चेस्टर : भारताचा विकेट कीपर ऋद्धीमान सहा याच्यावर इंग्लंडच्या मॅन्चेस्टरमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. सहा गेल्या काही महिन्यांपासून दुखापतग्रस्त होता. आता त्याच्या खांद्याची शस्त्रक्रिया झाल्याचं बीसीसीआयनं सांगितलं आहे. दुखापतीमुळेच सहाची इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी निवड झाली नाही. सहाऐवजी दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंतची निवड करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर सहानं ट्विट केलं आहे. आता सगळं ठिक आहे. तुमच्या शुभेच्छा आणि प्रेमासाठी धन्यवाद. बीसीसीआयनं मदत केल्यामुळे त्यांचेही धन्यवाद. लवकरच मैदानात पुनरागमन करीन, असं ट्विट सहानं केलं आहे.
आयपीएलमध्ये सहा हैदराबादकडून खेळला होता. कोलकात्याविरुद्धच्या दुसऱ्या क्वालिफायर मॅचमध्ये सहाच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे चेन्नईविरुद्धची आयपीएल फायनल सहा खेळू शकला नाही.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरून परत आल्यानंतर २९ जानेवारीपासून सहाच्या मांडीला दुखापत झाली. यानंतर सहा एनसीए (नॅशनल क्रिकेट अॅकेडमी) मध्ये गेला. मांडीबरोबरच सहाचा खांदाही दुखत होता. फेब्रुवारीमध्ये एमआरआय स्कॅन केल्यानंतर लॅबरल टियरचा खुलासा झाला. म्हणजेच जानेवारीमध्ये झालेल्या दुखापतीबद्दल बीसीसीआयनं आता खुलासा केला आहे.
इंजक्शन घेतल्यानंतर १९ मार्चला म्हणजेच आयपीएल सुरु व्हायच्या अडीच आठवडेआधी सहाला फिट घोषित करण्यात आलं. ७ मे रोजी सहाला पुन्हा एकदा खांद्याची दुखापत झाली. यानंतर त्याला दिल्लीमध्ये अल्ट्रासाऊंड इंजक्शन देण्यात आली. १३ जुलैदरम्यान सहाची खांद्याची दुखापत वाढली. स्टेराईडची इंजक्शन देऊनही सहाला फायदा झाला नाही. अखेर त्याच्यावर शस करण्यात आली.