Yashasvi Jaiswal: लेकाची टीम इंडियामध्ये निवड झाली अन् पाणीपुरी विकणारा बाप ढसाढसा रडला!

Yashasvi Jaiswals Father Get Emotional: माझ्या वडिलांना जेव्हा कळालं की माझी टीम इंडियामध्ये निवड झालीये, तेव्हा ते ढसाढसा रडू लागले. गुडन्यूज ऐकल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले होते, असं  यशस्वी जयस्वाल म्हणालाय.

सौरभ तळेकर | Updated: Jun 25, 2023, 05:21 PM IST
Yashasvi Jaiswal: लेकाची टीम इंडियामध्ये निवड झाली अन् पाणीपुरी विकणारा बाप ढसाढसा रडला! title=
IND vs WI, Yashasvi Jaiswal

IND vs WI, Yashasvi Jaiswal: राजस्थान रॉयल्सचा युवा आणि धडाकेबाज फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियामध्ये स्थान मिळवलं आहे. आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यातील वनडे सामन्यासाठी (IND vs WI ODI) यशस्वी जयस्वालला टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली आहे. त्यामुळे जयस्वाल कुटुंबियांसाठी हा सुवर्णक्षण ठरला आहे. अशातच लेकाची टीम इंडियामध्ये निवड झाल्यानंतर पाणीपुरी विकणारा बाप ढसाढसा रडल्याचं (Yashasvi Jaiswal father Emotional) दिसून आलंय. खुद्द यशस्वीने यावर बोलताना माहिती दिली.

काय म्हणाला यशस्वी जयस्वाल?

माझ्या वडिलांना जेव्हा कळालं की माझी टीम इंडियामध्ये निवड झालीये, तेव्हा ते ढसाढसा रडू लागले. गुडन्यूज ऐकल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले होते. आपला मुलगा आता भारतासाठी खेळणार याचा त्यांना आनंद झाला होता. मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचं चीज झालं, असं त्यांना वाटत होतं, असं म्हणताना यशस्वी जयस्वाल भावूक झाल्याचं दिसून आलंय. मी अद्याप आईला भेटलो नाही. मी सकाळी सरावासाठी बाहेर पडलो होतो. काही वेळाने मी माझ्या आईला जाऊन भेटेन, असंही त्याने म्हटलंय.

आयपीएलमध्ये आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय संघात निवड झालीये. त्यामुळे मला आनंद देखील निश्चित झालाय. मी माझं सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतणार आहे, असा विश्वास यशस्वीने दाखवला आहे. माझे वडील मला नेहमी सकारात्मक विचार करण्याचा आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याचा सल्ला देतात, असंही तो म्हणतो.

दरम्यान, माझं सिलेक्शन होईल की नाही? याबाबत माझ्या मनात थोडी भीती होती. मी घाबरलो होतो. मात्र, अखेर सिलेक्शन झालंय. मी या क्षणाचा आनंद घेत राहिल आणि खूप काही शिकण्यासाठी मेहनत घेत राहिल. मला सिनियर खेळाडूंकडून खूप काही शिकायचं आहे. तू कोणत्या मानसिकतेतून मैदानात उतरतो, हे तुझ्यावर अवलंबून आहे, असं मला रोहित शर्मा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांसारख्या खेळाडूंनी शिकवलं होतं, असंही बोलताना यशस्वी जयस्वाल म्हणाला आहे.

आणखी वाचा - Cheteshwar Pujara: टीम इंडियामधून वगळल्यानंतर चेतेश्वर पुजाराने दिली अशी प्रतिक्रिया, पाहा Video

दरम्यान, राजस्थान रॉयल्सकडून खेळताना जयस्वालने 14 सामन्यात 163 च्या स्ट्राइक रेटने 625 धावा केल्या होत्या. यावेळी त्याने 5 अर्धशतक तर 1 खणखणीत शतक देखील ठोकलं होतं. त्याचबरोबर र्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात स्टँडबाय खेळाडू म्हणून त्याची निवड झाली होती.