Yuvraj Singh झाला बेघर; आईनंच धक्के मारून काढलं घराबाहेर; VIDEO व्हायरल

या व्हिडीओमध्ये शबनम युवराज आणि झोरावर या दोघांनाही धक्के मारून बाहेर काढताना दिसतेय. युवराजने टीम इंडियाच्या 2007 टी-20 वर्ल्डकप आणि 2011 च्या वनडे वर्ल्डकपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Updated: Feb 22, 2023, 05:04 PM IST
Yuvraj Singh झाला बेघर; आईनंच धक्के मारून काढलं घराबाहेर; VIDEO व्हायरल title=

Yuvraj Singh: टीम इंडियाचा ओपनर शिखर धवन (Shikhar dhawan) नेहमी त्याच्या चित्र-विचित्र अंदाजात रिल्स बनवण्यासाठी फेमस आहे. दरम्यान माजी खेळाडू युवराज सिंह (Yuvraj Singh) देखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसतोय. युवराज सोशल मीडियावर चांगलाच एक्टिव्ह असतो. अशातच युवराजने सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये युवराजची आई शबनम आणि भाऊ झोरावर देखील दिसून येतायत.

इन्स्टाग्रावर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये शबनम युवराज आणि झोरावर या दोघांनाही धक्के मारून बाहेर काढताना दिसतेय. युवी या व्हिडीओला टेक्स्ट दिले आहेत. या टेक्स्टमध्ये लिहिल्याप्रमाणे, आईने भाजी आणायला पाठवलं होतं, कोथिंबीरीच्या जागी पुदिना घेऊन आलो. या कारणासाठी त्या दोघांना घराच्या बाहेर काढण्यात आलंय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zorawar Singh (@zove03)

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये युवराजने लिहिलंय की, सांगा...आम्ही काय चुकीचं केलं. या रीलवरून चाहत्यांनी युवराजची चांगलीच मजा घेतली आहे. 

गोरिलाला केलं होतं कॉपी

यापूर्वी देखील युवराजने एक मजेशीर व्हिडीओ तयार केला होता. ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये, युवराज गोरिलाला कॉपी करताना दिसतोय. या व्हिडीयोमध्ये 2 फ्रेम आहेत, ज्यातील एका फ्रेममध्ये युवराज दिसतोय, तर दुसऱ्या फ्रेममध्ये गोरिला दिसतोय. गोरिला जशी जशी कृती करतोय, तसं युवी त्याला कॉपी करताना दिसतो. 

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये युवराजने लिहिलंय की, जेव्हा तुम्ही क्रीजवर उतरणार असता आणि पुढचा फलंदाज वॉर्मअप करत असतो...कम ऑन बॉयज, लेट्स डू दिस.

2 वर्ल्डकप जिंकण्यामध्ये युवराजची महत्त्वाची भूमिका

युवराजने टीम इंडियाच्या 2007 टी-20 वर्ल्डकप आणि 2011 च्या वनडे वर्ल्डकपच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. वनडे वर्ल्डकपच्या टूर्नामेंटचा तो सर्वोत्तम खेळाडू होता. 2007 च्या T20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडचा गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरमध्य 6 सिक्स मारले होते. युवराजने भारतासाठी 40 टेस्ट, 304 वनडे आणि 58 टी-20 सामने खेळले आहेत.