Asia Cup 2023 मधून पत्ता कट, वर्ल्ड कपच्याही आशा मावळल्या, पण युजवेंद्र चहल म्हणतो...

Yuzvendra Chahal Motivational Tweet: अनेकजण चहलची निवड न केल्याने चाहते आधीच भारतीय निवड समितीवर टीका करत होते. अशातच आशिया कप (Asia Cup 2023) संघात न निवडल्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Aug 22, 2023, 01:55 PM IST
Asia Cup 2023 मधून पत्ता कट, वर्ल्ड कपच्याही आशा मावळल्या, पण युजवेंद्र चहल म्हणतो... title=
Yuzvendra Chahal

Yuzvendra Chahal On Asia Cup 2023 Selection: आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय संघाची (Team India Squad Announcement) घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वातील 17 सदस्यीय संघ श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेत दमदार कामगिरी करणार आहे. सोमवारी टीम इंडियाची (Team India) घोषणा ज्यावेळी झाली तेव्हा सर्वांची धाकधुक वाढली होती. कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. तसेच भारतीय खेळपट्टीवर कोणत्या फिरकीपटूना संधी मिळणार? याची देखील चर्चा होताना दिसत होती. चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी युझवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) घोषणा केली नाही. त्याऐवजी कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे. त्याने अनेकांनी संताप व्यक्त केला होता.

अनेकजण चहलची निवड न केल्याने चाहते आधीच भारतीय निवड समितीवर  (Team India Selection) टीका करत होते. अशातच आशिया कप संघात न निवडल्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. चहलने ट्विटर आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या भावना चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. चहल पुन्हा एकदा नव्या धैर्याने मैदानात उतरणार आहे.

पाहा पोस्ट

हर्षा भोगले म्हणतात...

संघात निवडलेल्यांपैकी चार फास्ट बॉलर आणि दोन फिरकीपटू उपलब्ध असतील. त्यातील खेळाडू 8 व्या क्रमांकापर्यंत फलंदाजीसाठी सक्षम आहेत. त्यामुळे आता एक फिरकीपटू आणि दोन फास्टर गोलंदाज खेळू शकतात. त्यामुळे आता भारताकडे एकतर अक्षरला खेळवा किंवा शार्दुलला खेळवा, याशिवाय पर्याय नसेल. या सर्व गणितीय आकडेमोडमध्ये यझुवेंद्र चहल कुठेच बसत नाही, असं हर्षा भोगले म्हणतात. 

आणखी वाचा - Asia Cup 2023: असं कसं चालेल! आशिया कपमध्ये नंबर 4 वर कोण खेळणार? रोहितने हसून जिरवलं उत्तर, म्हणतो...

रोहितने सांगितलं कारण...

टीमचा समतोल पाहता हा निर्णय घेण्यात आहे. चहलच्या जागेवर अक्षर पटेल याला संधी दिली आहे. आठव्या किंवा नवव्या स्थानावर फलंदाजी करेल असा फलंदाज हवा आहे. संघातून वेगवान गोलंदाजांना बाहेर करू शकत नाही त्यामुळे चहलची निवड करण्यात आली नाही रोहित शर्माने सांगितलं.

आणखी वाचा - Asia Cup 2023: टीम इंडियाने मारला पायावर धोंडा! सिलेक्टर्सने संघ निवडताना केली 'ही' मोठी चूक

 

आशिया कपसाठी टीम इंडिया :

 रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा,  केएल राहुल,  ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.