Yuzvendra Chahal : कर्णधाराच्या जागी उभा राहिला म्हणून चहलला दिला धक्का आणि...; राष्ट्रगीतावेळी सूर्या-हार्दिकचा व्हिडीओ व्हायरल

Yuzvendra Chahal : त्रिनिदादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात एक घटना अशी घडली ज्याचा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. टीम इंडियाचा स्पिनर गोलंदाज युझवेंद्र चहलचा ( Yuzvendra Chahal ) व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय.

सुरभि जगदीश | Updated: Aug 4, 2023, 11:20 AM IST
Yuzvendra Chahal : कर्णधाराच्या जागी उभा राहिला म्हणून चहलला दिला धक्का आणि...; राष्ट्रगीतावेळी सूर्या-हार्दिकचा व्हिडीओ व्हायरल title=

Yuzvendra Chahal : भारत आणि वेस्टइंडिज ( IND vs WI ) यांच्यामध्ये पहिला टी-20 सामना खेळवण्यात आला. यावेळी पहिल्या सामन्यात टीम इंडियाला ( Team India ) 4 रन्सने पराभवाचा सामना करावा लागला. त्रिनिदादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात एक घटना अशी घडली ज्याचा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. सामन्यापूर्वी राष्ट्रगीतावेळी उभं राहण्याच्या जागेवरून युझवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal ) आणि हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) यांच्यात गडबड झाली. 

यादरम्यान टीम इंडियाचा स्पिनर गोलंदाज युझवेंद्र चहलचा ( Yuzvendra Chahal ) व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये चहलला राष्ट्रगीताच्या वेळी हार्दिकच्या ( Hardik Pandya ) जागी उभं राहायचं होतं. मात्र यावेळी हार्दिक सूर्याने ( Suryakumar Yadav ) केलेलं कृत्य कॅमेरात कैद झालं आहे. ज्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसतोय. 

हार्दिक सूर्याने युझवेंद्र असं का केलं?

वेस्ट इंडिजविरुद्धची 5 सामन्यांची टी-20 मालिका हार्दिक पंड्याच्या ( Hardik Pandya ) नेतृत्वाखाली खेळवली जातेय. टी-20 सिरीजमधील पहिला सामना गुरुवारी खेळवण्यात आला. यावेळी सामन्यापूर्वी युजवेंद्र चहलचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये चहल राष्ट्रगीताच्या वेळी कर्णधाराच्या जागेवर उभा राहू इच्छित होता. मात्र सूर्याने ( Suryakumar Yadav ) त्याचा हात पकडून खेचलं आणि मागे उभं राहण्यास सांगितलं. 

याशिवाय कर्णधार हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya ) चहलला तिसऱ्या क्रमांकावर उभं राहण्याबाबत हातवारे केले. दरम्यान सूर्या ( Suryakumar Yadav ) , हार्दिक ( Hardik Pandya ) आणि चहलचा हा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला. यावेळी चाहते यावेळी विविध प्रतिक्रिया देताना दिसतायत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @cricket_baaz3

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा पराभव 

पहिल्या T20 सामन्यात वेस्ट इंडिज टीमने उत्तम कामगिरी करत भारताचा 4 रन्सने पराभव केला. पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजच्या टीमने टॉस जिंकला. वेस्ट इंडिजच्या टीमने प्रथम फलंदाजी करत 6 विकेट्स गमावून 149 रन्स केले होते. यावेळी अवघ्या 150 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना  टीम इंडियाच्या फलंदाजांना जमलं नाही. यावेळी भारताला 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावून केवळ 145 रन्स करता आले.