राष्ट्रपती मुखर्जी; उपराष्ट्रपती जसवंत सिंह?
राष्ट्रपतीपदासाठी युपीएकडून अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचं नाव पुढे केलं जाणार हे तर स्पष्ट झालंय. मग, भाजपकडून काहीच हालचाल होणार नाही, हे कसं शक्य आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंह उपराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत सहभागी झालेत.
Jun 12, 2012, 01:23 PM ISTअर्थमंत्री मुखर्जींनी दिले इंधन दरवाढीचे संकेत
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर डिझेल तसंच गॅस (एलपीजी)च्या किंमतीत वाढ केली जाणार असल्याचे संकेत अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिले आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर विविध राज्य सरकार तसंच मुख्यमंत्री, राजकीय पक्षाचे नेते यांच्याशी याबाबतीत चर्चा करुन या महत्वाच्या मुद्दांवर सर्वसंमतीने निर्णय घेणार असल्याचं मुखर्जींनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
Mar 19, 2012, 06:19 PM ISTजागतिक बाजारपेठेतून थेट इंधन खरेदी
जागतिक बाजारपेठेतून भारतीय विमान कंपन्यांना थेट इंधन खरेदी करू देण्यास केंद्र सरकारने अखेर मान्यता दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील विशेष मंत्रिगटाने थेट इंधन खरेदीला ग्रीन सिग्नल दाखविला आहे.
Feb 8, 2012, 08:57 AM IST