अर्थसंकल्प

अर्थसंकल्पात काय स्वस्त, काय महाग?

देशात महागाईचे आव्हान असून त्यावर विचार करण्यात येत असून ही महागाई कशी कमी करता येईल, यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पातून विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. सबका साथ, सबका विकास, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली. त्याचवेळी काय स्वस्त आणि काय महाग असेल, यावर एक नजर.

Jul 10, 2014, 01:16 PM IST

काँग्रेसच्या मुकेश शर्मांनी रेल्वेमंत्र्यांची नेमप्लेट तुडवली पायदळी

रेल्वे बजेटच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्या घरासमोर निदर्शनं केली. यावेळी काँग्रेस नेते मुकेश शर्मा यांनी गौडा यांच्या नावाची पाटी तोडली आणि पायाखाली तुडवली. 

Jul 8, 2014, 06:36 PM IST

संसदेचं आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन

१६व्या लोकसभेच्या अधिवेशनाला आजपासून सुरूवात होणार आहे. या सेशनमध्ये रेल्वे बजेट आणि अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी वाढती महागाईवरून सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.  

Jul 7, 2014, 09:09 AM IST

राज्याचा निराशाजनक अतिरिक्त अर्थसंकल्प

अत्यंत निराशाजनक असा राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज विधीमंडळात सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत हा अर्थसंकल्प मांडला. निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकार सवलतींचा पाऊस पाडेल, अशी अपेक्षा होती. मात्र दिवाळखोरीत गेलेल्या सरकारने त्या आघाडीवरही उपेक्षाच केली.

Jun 5, 2014, 11:21 PM IST

राज्याचा अर्थसंकल्प आज होणार सादर

राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर होत आहे. विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार तर विधानपरिषधेत अर्थ राज्यमंत्री राजेंद्र मुळक अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Feb 25, 2014, 08:26 AM IST

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार, विरोधक आक्रमक

राज्याचे उद्या सोमवारपासून सुरू होणारं चार दिवसांचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक मुद्यांनी गाजणार असल्याची चाहूल अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच लागलीय. कारण विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन आदर्श घोटाळा, टोल, वीज आणि एलबीटीच्या मुद्यांवरून सरकारला घेरणार असल्याची घोषणाच केलीय.

Feb 23, 2014, 05:21 PM IST

खुशखबर गाड्यांची किंमतीत लाखांची घट

गेल्याच आठवड्यात सादर झालेल्या अंतरिम बजेटमध्ये अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अबकारी कर कमी करण्याची घओणा केल्यामुळे ऑटोमोबाईल कंपन्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं.. गाड्यांच्या किंमती कमी केल्यायत...

Feb 20, 2014, 11:02 AM IST

रेल्वेचा अर्थसंकल्प सादर, ७२ नवीन गाड्या, भाडेवाढ नाही

रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपला पहिला अर्थसंकल्प मांडला. मात्र, तेलंगणा राज्याच्या मुद्द्यावर जोरदार गोंधळ झाल्याने लोकसभा स्थगित करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात कोणतीही भाडेवाढ करण्यात आलेले नाही. तर १७ नवीन एसी गाड्या सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेय. तर ३८ एक्सप्रेस गाड्यांची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली.

Feb 12, 2014, 01:51 PM IST

पालिका बजेटमध्ये काय काय मिळणार मुंबापुरीला?

देशातली सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचे बजेटही सर्वाधिक मोठे असते. आज स्थायी समिती बैठकीत वर्ष २०१४-२०१५ साठी पालिकेचं बजेट मांडलं जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचे हे बजेट असल्यानं त्याला अधिक महत्त्व आहे.

Feb 5, 2014, 09:39 AM IST

अधिवेशनाचं फलित ?

यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजले ते सभागृहातील कामकाजापेक्षा बाहेरील मुद्यांमुळे गाजले. पोलीस अधिकारी सचिन सूर्यवंशीला झालेली मारहाण, त्यानंतर आमदारांचे झालेले निलंबन, अजित दादांचे वादग्रस्त वक्तव्य या सगळ्या मुद्यांमुळे अधिवेशनाचे कामकाज 1-2 नव्हे तर तब्बल 11 दिवस वाया गेले.

Apr 18, 2013, 11:58 PM IST

चंद्रपूर महापालिकेचा कहर, पाळीव कुत्र्यांवरही लादला कर

चंद्रपूर महापालिकेचं पहिलं नव्यानेच अस्तित्वात आलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेचा पहिला अर्थसंकल्प काल स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. २७८ कोटींच्या या बजेटमध्ये पालिकेच्या उत्पन वाढीसाठी अनेक प्रकारचे नवीन कर नागरिकांवर लावण्यात आले आहेत.

Mar 1, 2013, 05:36 PM IST

अर्थसंकल्प : कृषी विकासासाठी काय मिळाले?

यंदाच्या बजेटमध्ये शेती विकासाठी भरीव तरतूद करण्यात आलीय. देशातील कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यासाठी ३ हजार ४१५ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. आज केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी २०१३-२०१४चा अर्थसंकल्प सादर केला.

Feb 28, 2013, 04:09 PM IST

अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर परिणाम

यंदाच्या बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री यांनी केलेल्या तरतुदींना शेअर बाजाराने थंड प्रतिसाद दिला आहे. अर्थसंकल्प सादर होताना शेअर बाजार घसरला होता. मात्र अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजार काही प्रमाणात वधारला.

Feb 28, 2013, 03:59 PM IST

देशात पहिली `महिला बँक`

देशातली पहिली महिला बँक स्थापन करण्याची घोषणा चिदंबरम यांनी केली. या महिला बँकेसाठी एक हजार कोटी रूपयांची तरतूदही करण्यात येणार आहे.

Feb 28, 2013, 01:14 PM IST