अर्थसंकल्प

प्रत्यक्ष कर

देशातील प्रत्येक व्यक्ती अथवा मालमत्तेवर वैयक्तिकरीत्या लादल्या गेलेल्या करांना ‘प्रत्यक्ष कर’ म्हटले जाते. वैयक्तिक प्राप्तिकर, संपत्ती कर, मालमत्ता कर, कंपनी कर (कॉर्पोरेट टॅक्स), रोखे व्यवहार कर वगैरे प्रत्यक्ष कराची अस्तित्त्वात असलेली रूपे आहेत.

Mar 15, 2012, 08:59 PM IST

निर्गुतवणूक (डिसइन्व्हेस्टमेंट)

२००४ सालात ‘यूपीए-१’चे अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात, ‘ते निर्गुतवणूक नव्हे तर ‘गुंतवणूकमंत्री’ बनतील’ असा आश्वासक विधान केले होते. उद्योगधंदे चालविणे ही सरकारची जबाबदारी नाही, तर त्या त्या क्षेत्रातील जाणकार व अनुभवी व्यावसायिकांनी

Mar 15, 2012, 08:57 PM IST

आर्थिक विकास दर (जीडीपी)

देशाच्या अर्थव्यवस्थेची सुदृढता जोखण्याचा ‘सकल राष्ट्रीय उत्पादन’ (ग्रोस डोमेस्टिक प्रॉडक्शन- जीडीपी) हा एक मूलभूत निर्देशक आहे. विशिष्ट कालावधीत देशांतर्गत उत्पादित सर्व वस्तू आणि सेवांचे रुपयातील मूल्य दर्शविण्याचे हे परिमाण आहे.

Mar 15, 2012, 08:51 PM IST

व्यापार तूट (ट्रेड डेफिसिट)

देशातून होणाऱ्या निर्यातीतून, देशात केली जाणारी आयात वजा केल्यास पुढे येणाऱ्या संकल्पनेला व्यापार संतुलन (बॅलन्स ऑफ ट्रेड) म्हटले जाते. जर निर्यातीचे प्रमाण हे आयातीपेक्षा जास्त असल्यास हे व्यापार संतुलन सकारात्मक म्हटले जाते.

Mar 15, 2012, 08:40 PM IST

महसुली तूट (रेव्हेन्यू डेफिसिट)

शब्दश: अर्थाने पाहायचे झाल्यास सरकारचा महसुली खर्च आणि महसुली लाभ यातील ही तफावत आहे. सरकारच्या महसुली खर्चात, विविध सरकारी विभाग आणि सामान्य प्रशासन सेवांसाठी येणारा खर्च (कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते वगैरे), सरकारी कर्जाचे परतफेडीचे हप्ते

Mar 15, 2012, 08:38 PM IST

असाल श्रीमंत तर, भरा जास्त कर!- अजित पवार

राज्याचा वाढणारा खर्च आणि मिळणारे महसूली उत्पन्न यातली तफावत दूर करण्यासाठी श्रीमंतावर जादा कर आकारण्याचा सरकारचा विचार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी याचे संकेत दिले आहेत.

Mar 1, 2012, 05:22 PM IST