आदर्श प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस!
आदर्शप्रकरणी ग्रामविकासमंत्री जयंत पाटलांना चौकशी आयोगानं नोटीस बजावलीए. त्यांना 7 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश आलेत. पुतण्या आदित्य पाटलाचा आदर्शमध्ये फ्लॅट असल्याचं पुढे आलं. त्यामुळे जयंत पाटील यांना फ्लॅटविषयी स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आलेत.
Jun 28, 2012, 10:25 PM ISTआदर्श घोटाळा : विलासराव हाजीर हो...SSS
मुंबईतील आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांची आज पुन्हा साक्ष होणार आहे. त्यासाठी ते चौकशी आयोगासमोर हजर झाले आहेत.
Jun 27, 2012, 12:52 PM ISTविलासरावांनी फोडले अशोक चव्हाणांवर खापर!
वादग्रस्त 'आदर्श'च्या इमारतीसाठी जमीन देण्याचा आदेशाच्या फाईल्स मुख्य सचिवांनीच तपासल्या होत्या, असे सांगून राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनीही या प्रकरणी महसूल खात्याकडे बोट दाखवत मी नाही त्यातला असे दाखवून दिले आहे.
Jun 26, 2012, 07:02 PM ISTआदर्श घोटाळा: CBI अपयशी, आरोपींना जामीन
आदर्श प्रकरणी आज सीबीआयला जोरदार झटका बसलाय. या घोटाळ्यातील ७ आरोपींना आज मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय.
May 29, 2012, 02:35 PM ISTआदर्श घोटाळ्याप्रकरणी तीन मंत्र्यांना समन्स
मुंबईतल्या आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांना चौकशी आयोगानं समन्स बजावलाय. तसंच राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनाही चौकशी आयोगानं समन्स बजावलाय.
May 23, 2012, 02:25 PM ISTआदर्श घोटाळा, अशोक चव्हाणांवर गुन्हा दाखल
आदर्श सोसायटीप्रकऱणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. ईडी अशोक चव्हाणांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे. सदनिका घेताना सदनिका खरेदीसाठी पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
Apr 30, 2012, 03:59 PM IST‘आदर्श’ची जमीन सरकारची - अहवाल
‘आदर्श’ची जमीन सरकारच्या मालकीची असल्याचे म्हटले गेले आहे. यामुळे तीन माजी मुख्यमंत्रांना मोठा दिलासा मिळाला आहे. आदर्श घोटाळ्याचा ठपका ठेवलेले आणि मुख्यमंत्री पदावरू पाय उतार व्हावे लागलेले अशोक चव्हाण यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
Apr 17, 2012, 12:11 PM ISTआदर्श घोटाळा, जेलबाहेरच पाचवी अटक
आदर्श घोटाळ्याप्रकरणी आज सीबीआयमार्फत पाचवी अटक करण्यात आली आहे. कन्हैय्यालाल गिडवाणींना यांना आर्थर रोड जेल बाहेरून सीबीआयने अटक केली आहे. याआधी सीबीआयला लाच देण्याच्या प्रयत्नाखाली अटक झाली होती.
Mar 21, 2012, 03:04 PM ISTआदर्श घोटाळा : अशोक चव्हाण, फाटकांना अटक?
आदर्श घोटाळाप्रकरणी आता चार जणांना झालेल्या अटकेनंतर आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि काही तत्कालीन अधिकाऱ्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Mar 21, 2012, 09:29 AM ISTआदर्श घोटाळा : चार जणांना अटक
आदर्श घोटाळाप्रकरणी अध्यक्ष वांछू आणि प्रवर्तक आर. सी. ठाकूर यांच्यासह ४ जणांना सिबीआयने अटक केली आहे. तर घोटाळ्याप्रकरणी सहा जणांना अटक वॉरंट बजावण्यात आला आहे. आदर्श घोटाळ्यातील ही पहिलीच अटक आहे.
Mar 20, 2012, 11:47 AM IST