www.24taas.com, मुंबई
मुंबईतल्या आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांना चौकशी आयोगानं समन्स बजावलाय. तसंच राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनाही चौकशी आयोगानं समन्स बजावलाय.
देशमुख, शिंदे आणि टोपे या तीनही मंत्र्यांना आदर्श घोटाळ्याप्रकरणी साक्ष नोंदवण्यासाठी चौकशी आयोगासमोर प्रत्यक्ष हजर रहावं लागणार आहे. याप्रकरणी शिंदे आणि विलासराव देशमुख यांनी चौकशी आयोगासमोर प्रत्यक्ष हजर न राहण्याबाबत परवानगी मागितली होती. मात्र, त्याला नकार देण्यात आलाय. त्यामुळे केवळ प्रतिज्ञापत्र देवून चालणार नाही, असं आयोगातर्फे या मंत्र्यांना सुनावण्यात आलंय.
21 आणि 22 जूनला विलासराव देशमुख यांना साक्ष देण्यासाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात आलंय. तर 25 आणि 26 जूनला सुशीलकुमार शिंदेची साक्ष होणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांना 31 मेपूर्वी आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.