आयपीएल-8: ऑरेंज कॅप डेविड वॉर्नरला; पर्पल कॅप विजेता ड्वेन ब्रावो
सनराइजर्स हैदराबादला आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये जागा बनवता आली नाही, मात्र हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर सर्वाधिक रन करत ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. आयपीएलची उपविजेता टीम चेन्नई सुपरकिंग्सचा ऑलराऊंडर ड्वेन ब्रावोनं सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅप आपल्या नावे केली आहे.
May 25, 2015, 11:53 AM IST...तर आयपीएल फायनल न खेळताच चेन्नई बनेल चॅम्पियन
चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल फायनल सामन्यावर पावसाचं सावट आहे. जर पाऊस झाला तर या पावसाचा फायदा धोनीच्या टीमला मिळू शकतो.
May 24, 2015, 06:37 PM ISTआयपीएल सट्टेबाजी प्रकरणी ८ प्रमुख शहरांत छापे
आयपीएलच्या सट्टेबाजी प्रकरणी ईडीच्यावतीने देशातील ८ प्रमुख शहरात छापे टाकण्यात आले. ईडीला मिळालेल्या माहिती नुसार गुजरातमध्ये काही व्यापारी आणि सट्टेबाज मिळून आयपीएल मॅच दरम्यान कोट्यवधी रुपयांचा सट्टा खेळला जात होता.
May 23, 2015, 06:21 PM IST...तर चेन्नई महेंद्रसिंग धोनीला मुकणार!
आयपीएलमधील अनेक टीम्सना आयपीएलच्या लिलावाच्या महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल हवे आहेत. जर बीसीसीआयने ही मागणी मान्य केली तर अनेक दिग्गज खेळाडू २०१७ च्या आयपीएलमध्ये वेगळ्या टीम्समध्ये खेळताना दिसतील.
May 22, 2015, 12:58 PM ISTरितिकाने भर स्टेडिअममध्ये केले रोहितला प्रेमाचे इशारे!
मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये खेळला गेलेला आयपीएल-८चा चेन्नईविरुद्धचा पहिला क्वालीफायर सामना मुंबई इंडियन्सने २५ रन्सने जिंकला. या सामन्यादरम्यान मुंबईच्या कर्णधार रोहित शर्माची गर्लफ्रेंड रितिका साजदेह ही देखील मैदानात उपस्थित होती.
May 20, 2015, 01:36 PM ISTआयपीएल-8: खेळाडूंचा एक-एक रन लाखांच्या घरात!
आयपीएल-८मध्ये युवराज सिंग, दिनेश कार्तिक, अॅजिंलो मॅथ्युजसारख्या खेळाडूंची एक-एक रन टीमला लाखो रुपयांना पडला आहे. तसंच जलद गोलंदाज जहीर खाननं घेतलेल्या विकेट्सही लाखो रुपयांना पडल्या आहेत.
May 18, 2015, 04:46 PM ISTऔरंगाबाद पोलिसांकडून क्रिकेट बेटिंगचा पर्दाफाश, ७ ठिकाणी छापे
औरंगाबाद पोलिसांनी किक्रेट मॅचवर बेटींग करणारं मोठं रँकेट उघडकीस आणलं आहे. गुरुवारी संध्याकाळपासून ते रात्री उशीरापर्यंत तब्बल ७ ठिकाणी छापे टाकत पोलिसांनी या रॅकेटचा भंडाफोड केलाय. याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे.. तर ६० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या रँकेटची पाळमुळं थेट दिल्ली मुंबईपर्यंत असण्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.
May 15, 2015, 10:14 PM ISTपोलिसांचे एकाच वेळी ७ ठिकाणी छापे, ६ जणांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 15, 2015, 09:47 PM ISTखूशखबर: ३०० रुपयांत मिळवा आयपीएलच्या फायनलचं तिकिट
इंडियन प्रिमिअर लीगच्या प्रेक्षकांसाठी बीसीसीआयने एक गिफ्ट दिलं आहे. आयपीएल- ८ च्या क्वालिफायर आणि फायनल सामन्यांच्या तिकिटाची किमान किंमत ३०० रुपये करण्यात आली आहे.
May 14, 2015, 06:09 PM IST'फिक्सिंग' बाबत ट्विटरवर फुटला मोदी बॉम्ब; धोनीच्या अडचणी वाढणार?
'आयपीएल सीझन ६' मधील स्पॉट फिक्सिंग प्रकणात चेन्नई सुपरकिंग्सच्या चार खेळाडूंचाही समावेश होता, असं म्हणणं आहे ललित मोंदीचं...
May 14, 2015, 03:54 PM ISTफिट होण्याच्या नादात विराट 'मैदानाबाहेर'?
रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान विराट कोहलीला मैदानात अचानक चक्कर येऊ लागली. त्यानंतर कोहलीने मैदानाबाहेर जाण्याच्या निर्णय घेतला, अशी माहिती समोर आली आहे.
May 12, 2015, 01:29 PM ISTएबी डिविलियर्स आणि विराटनं आयपीएलमध्ये रचला इतिहास
मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या एबी डिविलियर्स आणि विराट कोहलीनं नवा विक्रम आपल्या नावे केलाय. या सामन्यात दोघांनी केलेल्या २१५ धावांच्या भागिदारीच्या जोरावर बंगळुरूनं मुंबईवर ३९ धावांनी विजय मिळवला.
May 11, 2015, 03:46 PM IST५९ चेंडूत १९ फोर , ४ सिक्स, १३३ रन्स
बंगळूरच्या एबी डिव्हिलर्सने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना त्यांच्याच घरच्या मैदानावर ५९ चेंडूंत १३३ धावा ठोकल्या. एबी डिव्हिलर्सला कर्णधार विराट कोहलीने चांगली साथ दिल्याने बंगळूरने मुंबईसमोर विजयासाठी २३६ धावांचे जवळपास अशक्य आव्हान उभे केले.
May 10, 2015, 10:45 PM ISTचीअर लीडरचा आयपीएलबाबत खुलासा!
आयपीएलच्या सामन्यांमध्ये चीअर लीडर्सची भूमिका खेळासोबत वाढत जात आहे. मात्र या चीअर लीडर्सबाबत कोणालाही जास्त माहिती नसते.
May 10, 2015, 01:55 PM ISTब्रॅन्डन मॅक्क्युलमने सोडली चेन्नई सुपरकिंग्सची साथ!
आयपीएलमध्ये धडाकेबाज फलंदाजी करणारा चेन्नई सुपरकिंग्सचा ब्रॅन्डन मॅक्क्युलम इंग्लंडला रवाना झाला आहे. न्यूझीलंडचा संघ त्याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला आहे.
May 9, 2015, 02:18 PM IST