कल्याण डोंबिवलीत लागली यांना लॉटरी
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मतदान होण्याआधीच शिवसेना, भाजप आणि बसपनं आपलं खातं उघडलंय...
Oct 16, 2015, 08:51 PM ISTनिवडणुकीपूर्वीच शिवसेनेने कल्याण डोंबिवलीत उघडले खाते
कल्याण डोंबिवलीत आज अर्ज मागे घेण्याचा दिवशी भाजपसह इतर पक्षांना मागे टाकत शिवसेनेने आगामी निवडणुकीत आघाडी घेतली आहे.
Oct 16, 2015, 06:41 PM ISTकल्याण-डोंबिवलीत भाजपमध्ये नाराजी, विद्यमान नगरसेविका अपक्ष रिंगणात
कल्याण डोंबिवलीत तिकिट वाटपानंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली आहे. विद्यामान नगसेविकेने बंडोखरी करत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलाय. त्यामुळे या ठिकाणी भाजपला दणका बसण्याची शक्यता आहे.
Oct 14, 2015, 05:02 PM ISTकल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीत आतापर्यंत ३३४ उमेदवार रिंगणात, चुरस वाढलीय
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनं आणि भाजपनं १२० जागांवर, तर मनसेनं ८८, काँग्रेसनं ५६, राष्ट्रवादीनं ४५ आणि एमआयएमनं ७ जागांवर उमेदवार उभे केलेत. विशेष म्हणजे ऐनवेळी २७ गावांतल्या संघर्ष समितीनंही १८ उमेदवार रिंगणात उतरवल्यानं निवडणुकीतली चुरस वाढलीय.
Oct 14, 2015, 09:05 AM ISTकल्याण-डोंबिवलीत शिवसेना-भाजपचे स्वतंत्र उमेदवार
पित्रुपक्ष संपतो न संपतो तोच मध्यरात्री १२ वाजता भाजपने तिकीट वाटप सुरू केलं. मध्यरात्री तिकीट वाटपानंतर अनेक उमेदवारांनी सुटकेचा निश्वास सोडला. तर दुसरीकडे शिवसेनेने १२२ उमेदवारांची यादी तयार केलेय. त्यामुळे भाजप, शिवसेना पुन्हा एकदा स्वतंत्र लढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
Oct 13, 2015, 12:55 PM ISTKDMC निवडणूक: भाजप-शिवसेना स्वबळावर लढणार?
कडोंमपाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आलीय. पण युतीची निर्णय अजून काही झाला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीनं आघाडी केलीय. पण शिवसेना-भाजप स्वबळावर लढणार असल्याचे संकेत मिळतायेत.
Oct 12, 2015, 05:58 PM IST२७ गावांचा कल्याण-डोंबिवली पालिकेत समावेश नको : राज ठाकरे
कल्याणमधील २७ गावांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समावेश करु नका. ग्रामस्थांच्या संघर्ष समितीला आमचा पाठिंबा आहे. तसेच नवी मुंबईतील दिघा येथील कारवाईला आमचा विरोध आहे, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे.
Oct 10, 2015, 07:01 PM ISTराज ठाकरेंनी घेतलं मोदींवर तोंडसुख
सरकारमध्ये येऊन नुसती आश्वासन... नुसत्या थापा... आता थापाला दुसरं नाव पडलं आहे भाजपा... लोकं म्हणतात चल रे का भाजपा मारतोय... अशा खास ठाकरी शैली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर तोफ डागली.
Oct 9, 2015, 08:21 PM IST