कोर्ट

IPL स्पॉट फिक्सिंगमध्ये श्रीनिवासनच्या चौकशीचे आदेश

सुप्रीम कोर्टानं बीसीसीआयचे पदच्युत अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना धक्का दिलाय. आयपीएल गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत.

Apr 17, 2014, 04:21 PM IST

प्रेग्नंट पत्नीचं लैंगिक शोषण हे बलात्कारासारखच - कोर्ट

एका विवाहित महिलेचं पतीने केलेलं लैंगिक शोषण हे एका प्रकारे बलात्कारासारखंच असल्याचं दिल्लीतील न्यायालयाने म्हटलं आहे.

Mar 5, 2014, 05:22 PM IST

`हिट अँड रन` प्रकरणात सलमानला दिलासा

`हिट अँड रन` प्रकरणात सलमान खानला राज्य सरकारकडून दिलासा मिळालाय. या प्रकरणाची फेरसुनावणी करण्याचा निर्णय सत्र न्यायालयानं दिला होता. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यास राज्य सरकारनं नकार दिलाय.

Jan 28, 2014, 01:55 PM IST

बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेचा वाद चव्हाट्यावर

बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेचा वाद चव्हाट्यावर आलाय. बाळासाहेबांचे द्वितीय पुत्र जयदेव ठाकरे यांनी बाळासाहेंबाच्या मृत्यूपत्रावर आक्षेप नोंदवलाय.

Jan 20, 2014, 11:56 AM IST

‘हीट अँड रन’ सलमानला दिलासा, नव्यानं होणार सुनावणी

हीट अँड रन प्रकरणात यापुढं सलमान खानवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याअंतर्गत नव्यानं खटला चालवला जाणार आहे. या संदर्भातला अर्ज सलमान खाननं सत्र न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयानं हा अर्ज मंजूर करून घेतलाय. त्यानुसार २३ डिसेंबरपासून नव्यानं खटल्याची सुनावणी होणार आहे.

Dec 5, 2013, 03:28 PM IST

तरुण तेजपालचं `पौरुषत्व` कायम - मेडिकल अहवाल

सहकारी महिलेच्या लैंगिक शोषणाप्रकरणी गोवा पोलिसांनी तरुण तेजपालला अटक केल्यानंतर त्याची ‘पौरुषत्व चाचणी’ करण्यात आली.

Dec 3, 2013, 11:35 AM IST

लैंगिक शोषण : तेजपाल सहा दिवसांच्या पोलीस कोठडीत

लैंगिक शोषण प्रकरणी शनिवारी रात्री अटक करण्यात आलेल्या ‘तहलका’चा संपादक तरुण तेजपाल याला आज गोवा कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टानं त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.

Dec 1, 2013, 02:03 PM IST

कुठे गेली पूनम पांडे? पोलीस घेतायेत शोध!

नेहमीच वादात अडकणारी मॉडेल पूनम पांडे सध्या बेपत्ता आहे. पूनम पांडे अचानक गेली कुठे याचा शोध मुंबई आणि बंगळुरूचे पोलीस घेत आहेत.

Oct 15, 2013, 05:37 PM IST

इन्कम टॅक्स वाचवायचाय? बायकोला द्या घरभाडं!

नुकताच इन्कम टॅक्स कोर्टानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. जर तुम्हाला इन्कम टॅक्स वाचवायचा असेल आणि तुमचं राहतं घर पत्नीच्या नावावर असेल, तुमची बायकोही नोकरी करणारी असेल, तर तुम्ही बायकोलाच घरभाडं देऊन वर्षभराच्या घरभाड्यावर इन्कम टॅक्समध्ये सूट मिळवू शकता. असं करणं बेकायदेशीर नाही, असा निकाल देऊन इन्कम टॅक्स कोर्टानं नोकरदारांसाठी टॅक्स बचतीचा राजमार्ग खुला केलाय.

Oct 3, 2013, 12:41 PM IST

कोर्टानं काढली लालू समर्थकांच्या फटाक्यांची वात!

सीबीआयचं विशेष कोर्ट लालू प्रसाद यादव यांना दिलासा देईल अशी त्यांच्या समर्थकांना आशा होती. मात्र आता ती मावळलीय. कारण कोर्टानं त्यांना दोषी ठरवलंय. त्यामुळं सेलिब्रेशनसाठी आणलेले फटाके तसेच राहिलेत.

Sep 30, 2013, 01:44 PM IST

आसाराम बापूंची आज सुनावणी, दिलासा की पुन्हा जेल?

अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले आसाराम बापू यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपतेय. त्यांना आज जोधपूरच्या न्यायालयात हजर केलं जाईल.

Sep 30, 2013, 09:24 AM IST

चाराघोटाळा प्रकरणी आज निर्णय, लालूंच्या भविष्याचा फैसला!

चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचे विशेष न्यायालय आज निर्णय देणार आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव हे या प्रकरणातले मुख्य आरोपी आहेत.

Sep 30, 2013, 08:49 AM IST

आयपीएल स्पॉटफिक्सिंग: आज आरोपपत्र दाखल?

आयपीएल स्पॉटफिक्सिंग प्रकरणी आज मुंबई पोलीस आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. २१ जणांची नावं आरोपपत्रात असण्याची शक्यता आहे. यात १९ बुकींचा समावेश आहे.

Sep 19, 2013, 01:03 PM IST

आसाराम बापू शुद्ध चारित्र्याचे- नारायण साई

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आसाराम बापूंची पाठराखण त्यांचा मुलगा नारायण साईनं केलीय. आसाराम बापूंचं चारित्र्य शुद्ध आहे, त्याविषयी संपूर्ण जनतेलाही लवकरच खरं ते कळेल असं साई म्हणाले.

Sep 18, 2013, 04:03 PM IST

मुजफ्फरनगर दंगल : राजकीय नेत्यांविरुद्द अटक वॉरंट

मुजफ्फरनगर दंगल प्रकरणात एका स्थानिक कोर्टानं १६ जणांविरुद्ध वॉरंट बजावलंय. दंगल भडकावल्याचा आरोप ठेऊन उत्तर प्रदेशचे सहा राजकीय नेत्यांविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आलंय. हे सहा नेते भाजप आणि बीएसपीचे नेते आहेत.

Sep 18, 2013, 02:07 PM IST