दिल्ली गँगरेप

दिल्ली गँगरेप : बलात्काऱ्यांना फाशीच!

आज दिल्लीच्या साकेत कोर्टानं एक ऐतिहासिक निकाल दिलाय. दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुकेश (वय २६), विनय शर्मा (२०), पवन गुप्ता (१९) व अक्षय सिंह ठाकूर (२८) या चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय.

Sep 13, 2013, 02:56 PM IST

दिल्ली गँगरेप : १६ डिसेंबरची रात्र आणि नंतर...!

१६ डिसेंबर २०१२ ची दिल्ली गँगरेप प्रकरणातील पीडितेसाठी रात्र जणू काळरात्रच होती... त्या घटनेनंतर जे काही घडलं त्यावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट...

Sep 13, 2013, 10:40 AM IST

दिल्ली गँगरेप : ‘त्या’ नराधमांना फाशी की जन्मठेप?

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरण खटल्याचा निकाल आज दुपारी अडीच वाजता लागणार आहे.

Sep 13, 2013, 10:25 AM IST

दिल्ली गँगरेप : कोर्टानं निर्णय ठेवला राखून, शुक्रवारी सुनावणार शिक्षा

दिल्ली गँगरेप प्रकरणी दिल्लीतील फास्ट ट्रॅक कोर्टानं आपला निर्णय राखून ठेवलाय. दोषी आरोपींना शुक्रवारी दुपारी अडीच वाजता शिक्षा सुनावण्यात येणार आहेत. चारही आरोपींना काल कोर्टानं दोषी ठरवलं.

Sep 11, 2013, 02:22 PM IST

दिल्ली गँगरेप: आज निर्णय, फाशी की जन्मठेप?

दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ची काळरात्र... चालत्या बसमध्ये झालेल्या गँगरेप प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टानं काल चारही आरोपींना दोषी ठरवलंय. आज या चारही नराधमांना सकाळी ११ वाजता शिक्षा सुनावली जाणार आहे. चौघा आरोपींना जास्तीत जास्त फाशी आणि कमीत कमी जन्मठेप होऊ शकते. या घटनेमुळं देशभरात खळबळ उडाली होती आणि सरकारनंही पुढाकार घेत कडक बलात्कारविरोधी कायदा आणला होता.

Sep 11, 2013, 08:26 AM IST

दिल्ली गँगरेप: चारही आरोपी दोषी, उद्या शिक्षा सुनावणार

दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ला झालेल्या गँगरेप आणि हत्ये प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टातील सुनावणी आता पूर्ण झाली आहे. कोर्टानं चारही आरोपींना दोषी ठरवलं असून याबाबतची शिक्षा कोर्ट उद्या सुनावणार आहे.

Sep 10, 2013, 01:27 PM IST

दिल्ली गँगरेप प्रकरणी आज निर्णय येण्याची शक्यता

राजधानीत १६ डिसेंबर २०१२ रोजी `पॅरामेडिकल`चं शिक्षण घेत असलेल्या २३ वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये झालेल्या गँगरेपचा उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील चार सज्ञान आरोपींवर दिल्ली इथल्या `फास्ट ट्रॅक` कोर्टात खटला सुरू आहे.

Sep 9, 2013, 11:51 PM IST

‘त्या’ अल्पवयीन नराधमाला फाशी द्या- ‘निर्भया’चे कुटुंबिय

दिल्लीतील ‘निर्भया’ बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला सुनावण्यात आलेली तीन वर्षाची शिक्षा आपल्याला मान्य नसून त्याविरोधात हायकोर्टात जाणार असल्याचं निर्भयाचे कुटुंबिय म्हणाले. शिवाय `त्या`नराधमाला फाशीचीच शिक्षा हवी, अशी मागणीही त्यांनी केली. जुवेनाईल कोर्टाच्या निकालाबाबत त्यांनी निराशा व्यक्त केली.

Sep 1, 2013, 08:41 AM IST

दिल्ली गँगरेप - अल्पवयीन आरोपीला ३ वर्षाची शिक्षा

दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या अल्पवयीन आरोपीला दोषी ठरवत ज्युवेनाईल कोर्टानं तीन वर्षाची शिक्षा सुनावलीय. `निर्भया`वर क्रूरपणे बलात्कार करणाऱ्या `सहाव्या` आरोपीचं वय न पाहता, त्यालाही सर्वसामान्य आरोपींप्रमाणं शिक्षा द्यावी, या याचिकेला सुप्रीम कोर्टानं फेटाळलं होतं. त्यानंतर शनिवारी हा निर्णय देण्यात आला.

Sep 1, 2013, 08:17 AM IST

दिल्ली गँगरेप : अल्पवयीन आरोपी दोषी!

दिल्ली गँगरेप प्रकरणात आज पहिला निकाल येण्याची शक्यता आहे. ‘ज्युवेनाईल जस्टीस बोर्डा’कडून हा निर्णय अपेक्षित आहे.

Jul 11, 2013, 10:23 AM IST

दिल्ली गँगरेप : आरोपीला मारहाण आणि विषप्रयोग!

दिल्ली गँगरेप प्रकरणातील एका आरोपी विनय शर्मा याला तुरुंगातील इतर कैद्यांनी मारहाण केलीय तसंच त्याच्यावर गेल्या महिनाभरापासून विषप्रयोगही होतोय, असा दावा त्याच्या वकिलांनी केलाय.

May 16, 2013, 08:42 AM IST

बलात्काराच्या घटना होत राहतात – गृहमंत्री शिंदे

दिल्लीत पाच वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्कारानंतर देशभरात संतापाची लाट आहे. लोक रस्त्यावर तर विरोधी खासदारांनी संसदेत आवाज उठवलाय. मात्र, असे असताना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी संतापाच्या आगीत तेल ओतण्याचे काम केलेय.

Apr 22, 2013, 04:43 PM IST

दि्ल्लीतील बलात्कारप्रकरणी मनोजला कोठडी

दिल्लीतल्या चिमुरडीवरील बलात्कारप्रकरणी आरोपी नराधम मनोजला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. दिल्लीतल्या कडककड्डमा कोर्टानं या नराधमाला ४ मे पर्यंत न्यायलीन कोठडी सुनावलीय.

Apr 22, 2013, 08:21 AM IST

दिल्ली गँगरेप : आरोपीला हवाईदलाचा इंटरव्ह्यू कॉल

दिल्लीत डिसेंबर महिन्यात तरुणीवर चालत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील एका आरोपीला भारतीय वायुसेनेमध्ये भरती होण्यासाठी इंटरव्ह्यू कॉल आलाय.

Mar 28, 2013, 07:50 AM IST

बलात्कार पीडितेच्या नावाने नवी रेल्वे?

भारतीय रेल्वेच्या नव्या आगगाडीला नवी दिल्लीतील सामूहिक बलात्कार पीडित मुलीचं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे. लवकरच छपरा-आनंद विहार एक्सप्रेस या आठवड्यातून एकदा प्रवास करणाऱ्या रेल्वेला ‘निर्भया एक्सप्रेस’ किंवा ‘बेटी एक्सप्रेस’ हे नाव देण्यात येऊ शकतं.

Mar 14, 2013, 05:03 PM IST