दिल्ली गँगरेप

दिल्ली गँग रेप : राम सिंहची हत्या - वकील

दिल्लीमध्ये झालेल्या सामूहीक बलात्कार प्रकरणातला मुख्य आरोपी राम सिंहच्या आत्महत्येला नवी कलाटणी मिळालीये. रामसिंगच्या वकिलांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा सनसनाटी आरोप केलाय.

Mar 11, 2013, 01:23 PM IST

दिल्ली गँगरेप : मुख्य आरोपीची जेलमध्ये आत्महत्या

दिल्लीतील गँगरेप प्रकरणातील प्रमुख आरोपी राम सिंह याने आज पहाटे पाच वाजता तिहार कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला आज न्यायालापुढे हजर करण्यात येणार होते. त्यापूर्वीच त्याने आपले जीवन संपविले.

Mar 11, 2013, 08:52 AM IST

`भारतीय लोक सेक्सच्या विचारांनी पछाडलेले असतात!`

भारतात वारंवार घडणाऱ्या बलात्काराच्या घटनांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव बदनाम होत आहे. अनेक परदेशी वेबसाइट्स भारताला बदनाम करू लागल्या आहेत.

Mar 3, 2013, 05:29 PM IST

अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी ‘निर्भया निधी’

दिल्ली गँगरेप घटनेचे पडसाद यंदाच्या अर्थसंकल्पावरही उमटले आहेत. भारतीय महिलांच्या सक्षमीकरणासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आली आहे. या निधीला ‘निर्भया निधी’ हे नाव देण्यात आलं आहे.

Feb 28, 2013, 02:30 PM IST

दिल्ली गँगरेप : पाच जणांवर आरोप निश्चित

दिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आलेल्या पाच जणांवर फास्ट ट्रॅक कोर्टाने आरोपांवर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे त्यांची शिक्षा आता अटळ झाली आहे.

Feb 2, 2013, 10:11 PM IST

का करायचं माफ ?

दिल्ली गॅंगरेपमधला सहावा आरोपी ठरला `अल्पवयीन` १८ वर्षाखालील आरोपीला गंभीर गुन्ह्यातही का मिळते माफी ? बालसुधारगृहात तरी सुधरतात का हे आरोपी ? वेळ आलीय का कायद्यात बदल करण्याची ?

Jan 29, 2013, 11:42 PM IST

दिल्ली गँगरेप : सहावा आरोपी ‘अल्पवयीन’च!

दिल्ली बस गँगरेप प्रकरणातला सहावा आरोपी अल्पवयीन असल्याचं कोर्टात सिद्ध झालंय. शाळेच्या दाखल्याचा पुरावा ग्राह्य धरून कोर्टानं `त्या` आरोपीला अल्पवयीन मानलंय

Jan 28, 2013, 05:03 PM IST

अबू आझमींचं राज ठाकरेंना आव्हान

जालना येथे समाजवादी पार्टीने आयोजित केलेल्या मेळाव्यात भाषण करताना अबू आझमी यांनी राज ठाकरे यांना पुन्हा एकदा खुलं आव्हान दिलं आहे. दिल्ली बलात्कार प्रकरणातील आरोपी युपी-बिहापी असल्याचा आरोप करणारे राज ठाकरे औरंगाबादमधील गँगरेप घटनेबाबत का मौन बाळगून गप्प आहेत? असा सवाल अबू आझमींनी केला.

Jan 28, 2013, 04:50 PM IST

बलात्कार दोषींना फाशीच्या शिक्षेची सूचना टाळली; वर्मा समितीचा अहवाल

दोषींच्या शिक्षेत वाढ करून ती २० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि सामूहिक बलात्कारासाठी आजीवन कारावास अशा शिक्षेचा सूचना या समितीनं केलीय. पण, बलात्कारातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यावर मात्र या समितीनं टाळाटाळच केलीय.

Jan 24, 2013, 12:27 PM IST

दिल्ली गँगरेप पीडितेच्या यशानं पाणावले डोळे!

दिल्ली बलात्काराच्या घटनेनं सगळा देश ढवळून काढला. हा खटलाही फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू झालाय. त्याचवेळी या दुर्दैवी तरुणीनं दिलेल्या शेवटच्या परीक्षेचे गुण समजले आणि तिच्या यशानं पुन्हा एकदा अनेकांचे डोळे पाणावलेत.

Jan 24, 2013, 09:36 AM IST

दिल्ली गँगरेप : ‘तो’ अल्पवयीन नाही!

गेल्या महिन्यात १६ डिसेंबर रोजी बसमध्ये तरुणीवर झालेल्या गँगरेप प्रकरणातला सहावा आरोपी अल्पवयीन नाही, हे आता सिद्ध झालंय.

Jan 22, 2013, 10:08 AM IST

शौचालय बांधा, बलात्कार टाळा- जयराम रमेश

केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी शनिवारी रायपूर येथे बलात्करांमागच्या कारणांबद्दल मत मांजताना त्यांचा संबंध थेट शौचालयांशी लावला आहे. ग्रामीण भारतातजोपर्यंत घरोघरी शौचालयं बांधली जात नाहीत, तोपर्यंत बलात्कारासारख्या घटना कमी होणार नाहीत, असं रमेश म्हणाले.

Jan 13, 2013, 03:58 PM IST

‘आसाराम बापूंची पुस्तकं जाळून टाकणार’

मानवतेलाही काळीमा फासणाऱ्या दिल्लीच्या सामूहिक बलात्काराच्या घटनेत मुलीलाच दोषी ठरवणाऱ्या आसाराम बापूंची समाजातील सर्वच स्तरांतून निंदा होतेय. खुद्द पीडित मुलीच्या कुटुंबीयांनीही स्वत:ला अध्यात्मिक गुरू म्हणवणाऱ्या आसाराम बापूंवर करडी प्रतिक्रिया दिलीय.

Jan 9, 2013, 09:57 AM IST

दिल्ली गँगरेप : कॅमेऱ्याच्या साहाय्यानं सुनावणी

दिल्लीमध्ये गेल्या महिन्यात घडलेल्या सामाहिक बलात्कार प्रकरणाची सुनावणी एका स्थानिक न्यायालयात सोमवारी सुरू झाली. पण या सुनावणीसाठी न्यायालयात एकच गर्दी झाल्यानं सगळ्यांचाच गोंधळ उडाला. त्यामुळे आरोपींना न्यायालयात उपस्थित न करता कॅमेऱ्याच्या साहाय्यानं या प्रकरणाच्या सुनावणीचे आदेश देण्यात आलेत.

Jan 8, 2013, 09:06 AM IST

रोडरोमिओंच्या मुकाबल्यासाठी रणरागिणी सज्ज

पिंपरीतल्या रणरागिणी आता रोडरोमिओंचा मुकाबला करण्यास सज्ज झाल्या आहेत. पोलिसांनी पुढाकार घेवून पिंपरी-चिंचवड मधल्या तरुणींना कराटे प्रशिक्षण देणं सुरु केलंय. या उपक्रमाचं सर्वसामान्यांमधून स्वागत होतंय.

Jan 6, 2013, 05:54 PM IST