दीपक केसरकरांचा आमदारकीचा राजीनामा, तर बाळा भिसेंची हकालपट्टी
कोकणातले राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केसरकरांचा राजीनामा मागितल्याचं कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिलीय. प्रदेशाध्यक्षांच्या सभेला गैरहजर राहिल्यामुळं केसरकरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय.
Apr 13, 2014, 01:40 PM ISTअजित पवार भडकलेत, राणेंबाबत भूमिकेवर दमबाजी
रत्नागिरी-सिंधुदुर्गातल्या वादावर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या आदेशांचं पालन करावं असा दम उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिलाय. सिंधुदुर्गात झालेल्या सभेत त्यांनी कार्यकर्त्यांना दम दिलाय.
Apr 11, 2014, 05:36 PM ISTराणेंना राष्ट्रवादीची ठसन कायम, प्रचारास नकार
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेली ठसन अजूनही कायम आहे. सिंधुदुर्गात नीलेश राणे यांना मदत करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा नकार कायम आहे.
Apr 10, 2014, 05:04 PM ISTराणेंचा प्रचार नाही, दीपक केसरकर आक्रमक
कोकणात राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सध्या घमासान सुरू आहे. काँग्रेसनेते नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी मदत न करण्याचा निर्णय सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांनी घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगूनही दीपक केसरकर आक्रमक दिसत आहे. ते आपल्या निर्णयावर ठाम असून नीलेश राणेंचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केलेय. दरम्यान, आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करुनच पुढील निर्णय घेणार, अशी माहिती केसरकर यांनी दिलेय.
Apr 3, 2014, 11:27 AM ISTराणेंचे वस्त्रहरण आणि घडामोडी...
नारायण राणे यांच्या कुडाळच्या वस्त्रहरण सभेनंतर राणे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये महाभारत रंगलंय. राणेंनी अजित पवार आणि गृहमंत्र्यांना टार्गेट केल्यानंतर, आता राष्ट्रवादीकडून पलटवार होऊ लागले आहेत. दोन्ही बाजूंकडून वैयक्तिक आरोप प्रत्यारोप हो लागल्यानं, ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा वाद रंगण्याची चिन्ह आहेत.
Feb 2, 2012, 08:45 AM ISTराष्ट्रवादीचा राणेंवर 'हल्लाबोल'
कोकणात नारायण राणेंनी काल राष्ट्रवादीच्या नेत्यांचे जाहीर वस्त्रहरण केल्यानंतर बिथरलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राणेंवर आज एकमुखी हल्ला चढवला. सर्वांवरच राणेंनी टीकेचे प्रहार केल्यानं राष्ट्रवादीनं आज राणेंवर हल्लाबोल केला.
Feb 1, 2012, 08:28 PM IST