महाराष्ट्र बातम्या

सुशांत आणि आर्यन प्रकरणामुळे प्रसिद्धीत आलेले समीर वानखेडे राजकारणात उतरणार, येथून निवडणूक लढवणार

Sameer Wankhede News : NCBचे माजी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे महाराष्ट्राच्या राजकारणात उतरण्याची शक्यत आहे. ते विधानसभा निवडणुकीपासून आपली राजकीय इनिंग सुरु करु शकतात, अशी माहिती समोर आली आहे. ते वाशिममधून निवडणूक लढवू शकतात. मात्र, ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार याचा सस्पेन्स कायम आहे.

May 11, 2023, 11:47 AM IST

16 आमदार अपात्र ठरले तर कोणाची झोप उडणार? बदलणार विधानसभेतील गणित...

SC Hearing MLA Disqualification Today: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज 11 वाजता लागणार आहे. शिंदे - फडणवीस सरकारचा निकाल आज लागणार आहे. सर्वोच्च न्यायालय आज आपला 'सर्वोच्च' निर्णय देणार आहे. जर 16 आमदार अपात्र ठरले तर सगळेच गणित बदलणार आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांची झोप उडणार आहे. तसेच विधानसभेतील संख्येतही बदल होईल.

May 11, 2023, 10:16 AM IST

Maharashtra Politics News : 12 विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी

Maharashtra Political Crisis  : 12 विधानपरिषद आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर 12 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात  सुनावणी होणार आहे.  ठाकरे सरकानं 12 आमदारांची यादी दिली होती. ती कायम ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा आजही निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या यादीत आज निकालाचा समावेश नाही. 

May 10, 2023, 10:58 AM IST

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा येईन म्हटलं की येतो.. राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता !

Devendra Fadnavis : राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात असतानाच मी पुन्हा येईन, असे फडणवीसांनी म्हटले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बेळगाव दौरा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

May 5, 2023, 11:43 AM IST

राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता, राजकीय घडामोडींना वेग

Maharashtra Political Crisis : सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल पुढच्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडा महाराष्ट्राच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने राज्यपालांची भेट घेतली. 

May 5, 2023, 09:18 AM IST

Threat to Nitin Gadkari : गडकरी यांना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीच्या चौकशीत धक्कादायक खुलासा

Threat to Nitin Gadkari : जयेश पुजारीच्या  रडारवर नितीन गडकरी यांच्यासह कर्नाटकातील नेते होते. नेत्यांच्या हत्येसाठी जेलमधून गुंडांना आर्थिक मदत केल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे तीन कॉल आले होते. त्यानंतर दुसऱ्यांदाही धमकी आली होती.

Apr 14, 2023, 03:27 PM IST

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर राज्यमंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्याने राज्यमंत्रीमंडळ विस्तार रखडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय  काय निर्णय घेते यावर राज्य सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. 

Apr 5, 2023, 12:47 PM IST

Jotiba Yatra 2023 : जोतिबाच्या नावानं चांगभलं! दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेत सासनकाठ्यांचं महत्त्व का असतं?

Jotiba Yatra 2023: दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या जोतिबा चैत्र यात्रेचा (Jyotiba chaitra yatra 2023) आज मुख्य दिवस. या यात्रेसाठी महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि गोवा राज्यातून दीड लाखांहून अधिक भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झालेत. (Kolhapur Jyotiba Yatra)

Apr 5, 2023, 10:46 AM IST

Sanjay Raut Death Threat: कोणालाही धमकी दिली तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाही - देवेंद्र फडणवीस

MP Sanjay Raut Death Threat: महाराष्ट्रमध्ये कोणी कोणालाही धमकी दिली तर सरकार आणि पोलीस शांत बसणार नाही. कोणताही व्यक्ती असला तरी कारवाई होईल. संपूर्ण तपास केला जाईल. आणि ज्याने कोणी धमकी दिली असेल त्यावर कारवाई होईल, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

Apr 1, 2023, 01:12 PM IST

छत्रपती संभाजीनगरमधून आणखी एक धक्कादायक बातमी, या गावात राडा

Rada in Harsul village : छत्रपती संभाजीनगरमधून आणखी एक धक्कादायक बातमी. हर्सुल भागातल्या ओव्हर गावामध्येही दोन गटांच्या वादात तुफान दगडफेक झाली आहे.

Mar 31, 2023, 03:14 PM IST

Ajit Pawar : राज्यात दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न, अजित पवार यांचा गंभीर आरोप

Ajit Pawar On Riots in Maharashtra : राज्यात दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली दंगल सरकारपुरस्कृत असल्याचा मोठा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

Mar 31, 2023, 02:58 PM IST

India Weather Update : हवामानात पुन्हा बदल, पावसाची शक्यता

India Weather Update : दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात पुन्हा एकदा हवामानात बदल झालाय. पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांनी धडकी बसली आहे. तसेच महाराष्ट्रासह ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, सिक्कीम आणि बिहारमध्ये आज आणि उद्या म्हणजे 30-31 मार्च रोजी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. 

Mar 30, 2023, 07:19 AM IST

Rajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची पुन्हा एसीबी चौकशी

Rajan Salvi News :  राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची एसीबी चौकशी होणार आहे. साळवी कुटुंबासह आज शुक्रवारी संध्याकाळी 4.30 वाजता अलिबाग येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. याआधीही त्यांची चौकशी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा चौकशी होत आहे.

Mar 24, 2023, 08:33 AM IST

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : ठाकरे पिता-पुत्रांना शिंदे शिवसेनेकडून डिवचण्याचा प्रयत्न, जोरदार बॅनरबाजी

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिंदे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेत बॅनर वाॅर दिसून येत आहे. (Banner war in Shinde and Thackeray's Shiv Sena) माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या रस्त्याने जाणार आहेत. त्या मार्गावर  शिंदे गटाकडून शिवसेनेचे बॅनर लावण्यात आलेत.  

Mar 10, 2023, 11:34 AM IST

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 500 कोटींचा भ्रष्टाचार, अजित पवार यांचा गंभीर आरोप

Ajit Pawar on corruption :  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना माहिती जनसंपर्क विभागात (Information Public Relations Departmen) 500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार (500 crore corruption) झाल्याचा गंभीर आरोप अजित पवार यांनी केला आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठाकरे सरकारने चौकशी केली. त्यात ही बाब उघड झाली. मात्र, आताचे मुख्यमंत्री या सगळ्या प्रकारावर पडदा टाकत आहेत, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केलाय.

Mar 10, 2023, 08:19 AM IST