`विक्रांत`चा मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर लिलाव बाकी...
विक्रांत जहाजाचं म्युझियमही शक्य नाही आणि त्यावर हेलिपॅडही उभारता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. विक्रांतचा लिलाव होणं आता निश्चित झालंय.
Dec 5, 2013, 09:25 PM ISTमुख्यमंत्री चव्हाण यांचा राजकीय फटाका, शरद पवारांवर कोटी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. यापुढे आपण निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा दस्तुरखुद्द शरद पवारांनी केली आहे. परंतु शरद पवारांना निवडणूक लढवण्यास भाग पाडू, असे त्यांच्या निकटवर्तियांचे म्हणणे आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा गौप्यस्फोट केलाय.
Nov 2, 2013, 12:59 PM ISTनारायण राणे यांचे मुख्यमंत्र्यांवर पुन्हा शरसंधान
उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर पुन्हा शरसंधान साधलंय. मी मुख्यमंत्री असताना फाईल पेंडिंग ठेवत नव्हतो. मी एका दिवसात फाईल क्लियर करायचो. चांगल्या अधिका-यांचा वापर करुन घ्यायला हवा असा टोला मारून माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. राणे यांनी हा टोला मुख्यमंत्र्यांना लगावलाय. मागच्या मंत्रिमंडळ बैठकीतही राणे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.
Oct 24, 2013, 10:44 AM ISTसचिन तेंडुलकर होईल महाराष्ट्राचा ब्रँड अँम्बेसेडर - मुख्यमंत्री
काँग्रेसकडून राज्यसभेचा खासदार असलेला मास्टर ब्लास्टर सचिन आता महाराष्ट्राचा ब्रँड अँम्बेसेडर व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. एमसीए निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.
Oct 19, 2013, 09:50 AM ISTमुख्यमंत्री चव्हाण यांचा फ्लॅट अनधिकृतरित्या महिलेला भाड्याने
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वडाळ्याच्या एका सोसायटीतला फ्लॅट अनधिकृतरित्या एका महिलेला भाड्याने दिला आहे. सध्या ती महिला त्या सोसायटीतल्या लोकांना त्रास देत असल्याची माहिती आहे.
Oct 11, 2013, 11:50 AM ISTडॉकयार्ड इमारत दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री चव्हाण, उद्धव यांची भेट
दुर्घटनेनंतर डॉकयार्डमधल्या बाबूगेनू इमारतीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बचाव कार्याची माहिती घेतली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भेट दिली. चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणालेत.
Sep 28, 2013, 08:04 AM ISTमुख्यमंत्र्यांनी काही तासांत मंजुर केली नियमबाह्य कामांची फाईल!
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण फायली पेंडिंग ठेवतात, असा आरोप शरद पवार यांनी नुकताच केला. त्यावरून राज्यात फाईल वॉर चांगलेच गाजले... मात्र एक फाईल अशी आहे, जिच्यावर पृथ्वीबाबांनी एका दिवसातच मंजुरीचा कोंबडा काढला...
Sep 16, 2013, 06:49 PM ISTशरद पवारांचा `यू टर्न`!
अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले पॅकेज अद्याप मिळालेलं नाही या प्रश्नाच्या उत्तरात पवारांनी मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास व्यक्त केलाय.. शिवाय मुख्यमंत्री जे वक्तव्य करतात त्यावर ते विलंब झाला तरी अंमलबजावणी करतात असं पवारांनी म्हटलंय. ते यवतमाळमध्ये बोलत होते.
Sep 15, 2013, 07:59 PM ISTपैसे मिळवणे हाच सेनेचा अजेंडा – मुख्यमंत्री
पैसे मिळवणे हाच शिवसेनेचा एकमेव अजेंडा असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. डीएनएचे एस. बालकृष्णन यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवलं.
Sep 14, 2013, 10:28 PM ISTमुख्यमंत्र्यांचा पवारांवर पलटवार!
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कालच्या शरद पवारांच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नियमबाह्य कामं असल्यानं विचार करावा लागतो असं सांगत त्यांनी पवारांना टोला हाणलाय.
Sep 11, 2013, 05:52 PM ISTडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या : तर तपास सीबीआयकडे - मुख्यमंत्री
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेक-यांचा शोध घेण्यासाठी अन्य तपास यंत्रणांची मदत घेतली जाते. या प्रकरणात गरज पडली तर सीबीआयकडेही हे प्रकरण सोपवण्याची तयारी असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. ते कोल्हापुरात बोलत होते. या प्रकरणी अद्याप एकाही व्यक्तीला अटक केली नसल्याचं त्यांनी सांगितलं.
Sep 7, 2013, 09:00 AM ISTमुख्यमंत्र्याची पत्रकार परिषद `भलत्याच` विषयावर!
मुख्यमंत्र्यांची एक पत्रकार परिषद सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरलीय. दाभोलकर हत्या प्रकरण आणि मुंबई बलात्कार प्रकरण याविषयी महत्त्वाची माहिती मिळेल, अशी अपेक्षा होती.... पण घडलं वेगळंच....
Aug 27, 2013, 09:06 PM ISTगांधी हत्या करणाऱ्या शक्तीने केले कृत्य- मुख्यमंत्री
डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या ही राजकीय हत्या आहे. ज्या शक्तींनी महात्मा गांधींची हत्या केली, त्याच शक्तींनी आज डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला निषेध नोंदवला. त्यामुळे त्यांचा रोख कोणाकडे आहे, हा प्रश्न होतं आहे.
Aug 20, 2013, 08:15 PM ISTआदर्श अहवाल लटकला, विरोधक संतप्त
आदर्श चौकशी आयोगाचा अहवालावरून आता राजकारण तापलं आहे. हा अहवाल पावसाळी अधिवेशनात मांडला जाईल अशी शक्यता होती.
Aug 2, 2013, 07:52 PM ISTविठुराया अशीच कृपा ठेव, मुख्यमंत्र्याचे साकडे
यंदा राज्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे वारकरी समाधानी आहेत. त्यामुळे ‘विठुराया, अशीच कृपा असू दे’ असे गाऱ्हाणे घालणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठुरायाला साकडं घातलं.
Jul 19, 2013, 11:49 AM IST