वडाळ्यातील दुर्घटनेला जबाबदार कोण?
वडाळ्यात दरड कोसळून दोन जणांचे बळी गेले. वेळेवर उपाययोजना केल्या असत्या तर ही दुर्घटना घडली नसती. मुख्यमंत्र्यांनी इथल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचे आदेश देऊनही, ते गांभीर्यानं घेण्यात आले नाहीत.
Jul 11, 2013, 05:57 PM ISTइस्टर्न फ्रीवे वाहतुकासाठी खुला
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते इस्टर्न फ्रीवेचं उदघाटन करण्यात आलं. सीएसटी ते चेंबूरपर्यंतच्या साडे तेरा किलोमीटरचा हा मार्ग मुंबईकरांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय.
Jun 13, 2013, 08:12 PM ISTअहमद जावेद होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त?
अहमद जावेद हे नवे मुंबई पोलीस आयुक्त होण्याची शक्यता आहे. गृहखात्यातल्या सूत्रांनी ‘झी मीडिया’ला दिलेल्या माहितीनुसार अहमद जावेद यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही हिरवा कंदील दिलाय.
Jun 6, 2013, 05:46 PM ISTएलबीटी भरावाच लागेल – सुप्रीम कोर्ट
एलबीटीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेल्या व्यापाऱ्यांना सुप्रीम कोर्टानं दणका दिलाय. सुप्रीम कोर्टानं एलबीटीविरोधात दाखल केलेल्या सर्वच्या सर्व याचिका फेटाळून लावल्यात.
May 10, 2013, 04:09 PM ISTएलबीटीवर तोडगा काढा – शरद पवार
मुंबईच्या बाजारपेठा बंद राहणं हे अयोग्य आहे. एलबीटी प्रश्नी राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलाय.
May 9, 2013, 01:01 PM ISTमुजोर व्यापाऱ्यांनी सीएम, राज, उद्धव यांना धुडकावले
एलबीटी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात व्यापाऱ्यांनी संप पुकारलाय. याचा सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होतोय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी जनतेला वेठाला न धरण्याचं आवाहन वारंवार केलंय. असं असतानाही व्यापाऱ्यांनी संप सुरूच ठेवलाय. आता मनसे आणि शिवसेना याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय.
May 9, 2013, 12:28 PM ISTपुन्हा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांवर शाब्दिक हल्ला
गेले काही महिने शांत झालेलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं शाब्दिक युद्ध आता पुन्हा सुरू होण्याची चिन्हं आहेत. या संघर्षाला आणखी नवं निमित्त झालं ते मेट्रो चाचणीचं...
May 2, 2013, 08:11 PM ISTठाणे दुर्घटना : हात हलवत परतले दादा-बाबा-आबा
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री यांनीही घटनास्थळाला भेट दिलीय तीही ओझरती...
Apr 5, 2013, 02:44 PM ISTसरकार निगरगट्ट आणि गेंड्याच्या कातडीचं- राज
राज ठाकरेंनी सभेच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. त्यांच्याच वक्तव्याचे दाखले देत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारले.
Mar 24, 2013, 11:23 PM IST`केवळ `आधार` नाही म्हणून जनता निराधार नाही`
अनुदान किंवा स्कॉलरशिपसारख्या लाभापासून कुणीही वंचित राहणार नाही, केवळ आधारकार्ड नाही म्हणून हे लाभ मिळण्यात लाभधारक व्यक्ती अपात्र ठरणार नाही, असं सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील रहिवाशांना दिलंय.
Mar 19, 2013, 12:28 PM ISTमुख्यमंत्री हे वागणं बरे नव्हे - पवार
पुन्हा एकदा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसाच आघाडी सरकारमधील घटक पक्ष काँग्रेसलाही डिवचलंय. पृथ्वीराज चव्हाण यांना पवार म्हणालेत, मुख्यमंत्री हे वागण वागणं बरे नव्हे.
Mar 17, 2013, 10:40 AM IST‘घुबडामुळे जाणार मुख्यमंत्र्यांची खुर्ची’
श्रद्धा आणि अंधश्रद्धा... या दोघांमधला फरक कळणं फार कठिण नाही. पण, माणसाचा विश्वास कशावर बसेल आणि कशावर नाही हे सांगता येत नाही. असाच एक खेळ रंगला होता विधान परिषद सभागृहात...
Mar 15, 2013, 01:56 PM ISTयोजनांसाठी आधारकार्डबाबत काही अंशी शिथिलता
आधारकार्ड देशाच्या प्रत्येक नागरिकाला अनिवार्य केले आहे. मात्र ज्या जिल्ह्यात ८० टक्के आधार कार्डची नोंदणी झाली नाहीये. त्या जिल्ह्यात योजनांचे लाभ आधार क्रमांकांशी संलग्न करण्याची घोषणा करणार नाही.
Mar 13, 2013, 05:01 PM ISTराज्यात मराठी भाषा भवन – मुख्यमंत्री
राज्याची भाषा मराठी आहे. या माय मराठीसाठी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी अहवाल तयार करण्यात आला आहे. त्याचबरोबर मराठी भाषा भवनाची लवकरच निर्मिती केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली.
Feb 28, 2013, 07:21 PM ISTराज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश हे मुंबईत दाखल झाले आहेत. ते मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आज मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहेत.
Feb 20, 2013, 04:53 PM IST