मंत्री लक्ष्मण ढोबळेंचा पुतळा जाळला
साता-यात दलित महिलेला झालेल्या मारहाण प्रकरणी लक्ष्मणराव ढोबळेंनी केलेल्या धक्कादायक विधानाचे संतप्त पडसाद उमटायला सुरुवात झालीय. क-हाडमध्ये लक्ष्मणराव ढोबळेंचा पुतळा जाळलाय. कृष्णा हॉस्पिटल जवळ दलित महासंघानं हे आंदोलन केलंय.
Jan 13, 2012, 11:36 PM ISTआघाडी संदर्भात निर्णयासाठी मुख्यमंत्री दिल्लीत
मुंबई मनपातल्या काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा तिढा अधिकच वाढल्यानं मुख्यमंत्र्यांना अखेर दिल्ली दरबारी धाव घ्यावी लागली आहे. राष्ट्रवादीनं आज संध्याकाळचा अल्टिमेटम दिल्यामुळं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आघाडीबाबत निर्णय घेण्यासाठी अखेर दिल्लीला रवाना झाले आहेत.
Jan 9, 2012, 02:41 PM ISTकाँग्रेसची मेहरनजर, झाला निवडणुकीचा गजर
जे. जे. हॉस्पिटल एम्सप्रमाणे अद्ययावत करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. त्यासाठी चारशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
Jan 2, 2012, 06:53 PM ISTमुख्यमंत्र्यांचा अण्णांवर हल्लाबोल
अण्णा हजारेंच्या आंदोलनावर पृथ्वीराज चव्हाण यांनी आसूड ओढले आहेत. देश आर्थिक मंदीचा सामना करत असताना अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे अस्थिरता माजेल असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. अण्णा हजारे उद्यापासून तीन दिवस मुंबईतील एमएमआरडीएच्या मैदानावर उपोषणाला बसणार आहेत.
Dec 26, 2011, 05:16 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
मुख्यमंत्र्यांसमोर धामणगावच्या सभेत आत्महत्येचा प्रयत्न करणा-या अरुण सभाणे या शेतक-याची प्रकृती गंभीर आहे. त्यांना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलय. कापसाच्या प्रश्नावर चर्चा करण्याची मागणी सभाणे यांनी केली होती.
Dec 4, 2011, 05:14 PM ISTअण्णांचे मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र
लवासा प्रकरणी अण्णांनी मुख्यमंत्र्यांवरच ताशेरे ओढलेत. लवासा प्रकरणी मुख्यमंत्री दुटप्पी भूमिका कसे काय घेऊ शकतात, असा खडा सवाल केला अण्णांनी. यासंदर्भात अण्णांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये लवासा नियमित कसं काय करता येऊ शकतं, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
Nov 8, 2011, 02:09 PM ISTऊसाला २३०० रूपये भाव द्या - उद्धव
शेतकर्यांतच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांची आज भेट घेतली. यावेळी ऊसाला २३००रूपये भाव द्या, अशी मागणी केली.
Nov 8, 2011, 07:53 AM ISTमि. क्लिनवर भूखंड आरक्षणाचे शिंतोडे
बिल्डरचा हितासाठी झटणारे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण मंत्रीपदावरून जाऊन काही महिने होत नाही तोच मि. क्लिन म्हटले जाणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात भूखंड आरक्षण देण्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे
Nov 3, 2011, 01:23 PM IST