मोदी सरकार

'कॉंग्रेस पोटात घेऊनही विजयाचा सूर्य जन्मला नाही'

भांडूपमधील पोटनिवडणुकीत झालेल्या विजयाने हर्षभरीत झालेल्या भाजपला शिवसेनेने नांदेडच्या पराभवावरून चांगलेच लक्ष्य केले आहे. 'फक्त उपरणी बदलून इतरांना स्वपक्षात घ्यायचे व विजय साजरे करायचे उद्योग सुरू आहेत. नांदेडात ‘काँग्रेस’ पोटात घेऊनही विजयाचा सूर्य जन्मास आला नाही हे भांडुप विजयाचा उन्माद करणा-यांनी लक्षात घेतले पाहिजे!, अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर बाण मारला आहे.

Oct 14, 2017, 08:52 AM IST

कमळाबाईच्या 'विजया'ला लोकांनी चोपले

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील विजयात भाजपने मुसांडी मारल्याचे चित्र आकड्यांचे खेळ करून रंगवले जाते आहे. प्रत्यक्षात मात्र वस्तूस्थिती वेगळीच आहे. कमळाबाईच्या 'विजया'ला लोकांनी चोपले आहे. लोकांनी ग्रामपंचायत निवडणुकीत कमळाबाईस ‘तलाक’ दिला आहे, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे.

Oct 11, 2017, 07:55 AM IST

नितीन गडकरी यांच्या विधानावरून शिवसेनेची मोदी सरकारवर टोलेबाजी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या विधानावरून त्यांचे अभिनंदन करत शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारला वाकुल्या दावल्या आहेत. नोटाबंदीचा फियास्को होणारच होता. गरीब त्यात भरडले गेले आहेत. नितीन गडकरी यांनी ते मान्य केले हे गरीबांवर उपकारच म्हणायला हवेत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Oct 10, 2017, 08:43 AM IST

जीएसटी,नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान - शिवसेना

भाजपची सत्ता येताच ‘महागाईवर’ छत्रचामरे धरणारा ‘जीएसटी’त्याच मोदींनी लागू केला. मोदी जीएसटीचे समर्थक बनले. हा एक प्रकारे घूमजाव होता. जीएसटी व नोटाबंदीसारख्या निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले, अशा थेट शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

Oct 9, 2017, 08:26 AM IST

मोदी सरकारने रेल्वे अधिकाऱ्यांना आणले 'ट्रॅकवर'

 व्हीआयपी कल्चर बंद करुन ३६ वर्षे सुरु असलेला प्रोटोकॉल बंद करत रेल्वे मंत्रालयाद्वारे ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.  

Oct 8, 2017, 06:34 PM IST

'वसूल केलेला जीएसटी मोदी सरकार परत करणार का?'

केंद्र सरकारनं जीएसटीमध्ये केलेला बदल हा अभिनंदनीय असला तरी इतके दिवस वसूल केलेला जीएसटी सरकार परत करणार का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय.

Oct 7, 2017, 07:14 PM IST

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या खास शैलीत अगदी संयमीतपणे ठाकरे यांनी सरकारला शालजोडी लगावली. तसेच, सरकारच्या चांगल्या निर्णयाचे स्वागतही केले. उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे...

Oct 7, 2017, 03:36 PM IST

जनतेच्या रेट्यापुढे मोदी सरकार झुकले: उद्धव ठाकरे

सरकार जर जनतेसोबत नसेल तर, शिवसेना सरकारसबोत नव्हे तर, जनतेसोबत राहील, असे ठासून सांगतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या रेट्यापुढे सरकार झुकले, असा टोला भाजप सरकारला लगावला

Oct 7, 2017, 03:03 PM IST

राज ठाकरे यांच्या भाषणातील मुख्य १० मुद्दे

एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगरांचेंगरी निषेधार्थ संताप व्यक्त करण्यासाठी मनसेने मोर्चा काढला होता. या मोर्चाला चांगलाच प्रतिसाद मिळाला.

Oct 5, 2017, 03:52 PM IST

आयटीसह अनेक बड्या कंपन्यात कामगार कपात

केवळ आयटी क्षेत्रच नव्हे तर, देशातील अनेक बड्या कंपन्यांतील कामगारांवर बुरे दिनची वेळ आली आहे. अनेक कंपन्यांमधून कामगारांना काढून टाकले जात आहे. तर काही कंपन्यांमध्ये विविध कारणांमुळे कामगार स्वत:च नोकरी सोडत आहेत. एका अहवालानुसार आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये अनेक कंपन्यांमध्ये आगोदरच्या वर्षाच्या तुलनेत कमी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.

Oct 4, 2017, 02:29 PM IST

नोटबंदीवर यशवंत सिन्हा यांच्यानंतर शौरींचा मोदीजींना घरचा आहेर

नोटबंदीवरुन केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर  विरोधकांकडून टीका होत असताना आता  स्वकीयांकडून टीकेला तोंड द्यावे लागत आहे.  

Oct 4, 2017, 12:32 PM IST

अण्णा हजारेंचा पुन्हा एल्गार, डिसेंबरपासून आंदोलन

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे. जनलोकपाल कायद्यासाठी ते पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत. यासाठी ७-८ ऑक्टोबरला अण्णांची राळेगणसिद्धी येथे समर्थकांची बैठक बोलवली आहे.

Oct 2, 2017, 06:54 PM IST

मोदी सरकार केंद्र आणि राज्यस्तरावर २० लाख रिक्त पदं भरणार

देशात रोजगार निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने नवी योजना आखली आहे. यानुसार, येत्या काळात तब्बल २० लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.

Sep 28, 2017, 10:40 AM IST