रत्नागिरी

कोकणात भगव्याची लाट, दोन ठिकाणी जोरदार धक्का

कोकणात पुन्हा एकदा भगव्याची लाट पाहायला मिळाली आहे. दोन ठिकाणी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात धक्का बसला आहे. रत्नागिरीतील मंडणगड येथे राष्ट्रवादी आघाडीची सत्ता तर सिंधुदुर्गातील वैभववाडीत भाजपच्या गोटात काँग्रेसने मुसंडी मारली. 

Nov 2, 2015, 02:38 PM IST

राजापुरात १५ वर्षी मुलीवर काकासह पोलीसपाटलाकडून लैंगिक अत्याचार

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर काकासह गावच्या पोलीस पाटील अशा तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी येथे उघडकीला आली.

Oct 24, 2015, 02:03 PM IST

गोंधळात गोंधळ... खेड, चिपळूण, संगमेश्वर रायगडच्या ताब्यात!

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम पुन्हा एकदा वादात सापडलंय. कारण, मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची नव्याने विभागणी करताना निम्मा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्ह्याच्या स्वाधीन करण्यात आलाय. त्यामुळे भूमिसंपादन असेल किंवा चौपदरीकरणासंदर्भात इतर कोणतंही काम असेल तर रायगडलाच जावं लागेल. या भीतीने नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. तसंच हा आदेश रद्द करण्यात यावा, अशी मागणी होऊ लागलीय.

Oct 23, 2015, 05:31 PM IST

कोकणातील सागरी सुरक्षा रामभरोसे

कोकणातील सागरी सुरक्षा रामभरोसे

Oct 21, 2015, 10:10 PM IST

कोयना अवजलावरून शिवसेनेतच दोन गट

कोयनेच्या अवजलावरून शिवसेनेतच दोन गट पडल्याचं समोर आलंय. वाया जाणारं कोयनेचं पाणी मुंबईला नेण्याच्या रवींद्र वायकरच्या भूमिकेला रामदास कदमांनी विरोध दर्शवलाय. तर केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गिते यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. 

Oct 21, 2015, 12:35 PM IST

कोकण रेल्वेला २५ वर्षे, कोकणवासियांच्या समस्या कायम

कोकण रेल्वेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झालीत. मात्र कोकणवासियांच्या समस्या जैसे थे आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे कोकण सुपूत्र असल्याने कोकणवासियांना न्याय मिळणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Oct 15, 2015, 10:01 AM IST