राज्यात

राज्यात एक कोटीपेक्षा जास्त रेशन कार्ड्स बोगस

राज्यात तब्बल एक कोटीपेक्षा जास्त रेशन कार्ड्स बोगस असल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलीय. आशारसोबत रेशन कार्ड  जोडल्यामुळं बोगस कार्डबाबतची माहिती समोर आल्याचं त्यांनी सांगितलं. बोगस कार्ड्सचा आकडा दीड कोटीपर्यंत जाण्याची शक्यताही मुख्यमंत्र्यांनी वर्तवलीय.

Dec 7, 2016, 03:37 PM IST

राज्यात कर वसुली पोहोचली ८४१ कोटींवर

महानगरपालिका आणि नगरपालिकांचे विविध कर भरण्यासाठी एक हजार आणि पाचशे रुपये मुल्यांच्या व्यवहारातून रद्द झालेल्या जुन्या नोटा स्वीकारण्यात येत आहे. नागरीकांनी या संधीचा लाभ घेऊन राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिकांकडे विविध करांपोटी गेल्या सहा दिवसात एकूण ८४१ कोटीहून अधिक रुपयांचा भरणा केला आहे. 24 नोव्हेंबरपर्यत जुन्या चलनाने सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कार्यालयात कर स्वीकारण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या मालमत्तांचा कर आणि थकबाकी भरावी. असे आवाहन नगरविकास विभागाने केले आहे.

Nov 17, 2016, 11:42 PM IST

राज्यात सुख, शांती आणि समृद्धीसाठी मुख्यमंत्र्यांचं गणरायाला साकडं

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवसस्थानी गणरायाचं आगमन मोठ्या उत्साहात आगमन झालं. 

Sep 5, 2016, 02:20 PM IST

राज्यात ४ जुलैला शाळा बंद आंदोलन

संचमान्यतेचे नवे धोरण, वेतनेतर अनुदान, शाळेत मुख्याध्यापकाचे पद कायम राहावे अशा विविध मागण्यांसाठी शिक्षणसंस्था चालकांनी शाळा बंद आंदोलन पुकारलं आहे. ४ जुलै सोमवारी राज्यात एका दिवसासाठी शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास १५ जुलैपासून बेमुदत शाळा बंद करण्याचा इशारा देखील संघटनांनी दिला आहे. 

Jul 3, 2016, 11:11 PM IST

पुढील २ दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पाऊस

पुढील दोन तीन दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मान्सून पूर्व पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळाने वर्तवला आहे. 

Jun 6, 2016, 04:55 PM IST

राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस

हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात तीन दिवसांपासून वादळी वारे वाहू लागलेत. सोसाट्याच्या वा-यामुळे मोठी झाडं उन्मळून पडलीत. त्यातच काही घरांचं देखील नुकसान झालंय. त्यातच काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह तुरळक पाऊसही सुरू आहे. या दोन जिल्ह्यात वीज पडून ठार होण्याचा आकडा आता दहावर गेलाय. परभणीत दोन ठिकाणी वीज पडून 2 ठार 2 जखमी झालेत. सेलू तालुक्यातील नरसापुर येथे एक जण ठार तर मायलेक गंभीररित्या भाजले आहेत. जिंतूर तालुक्यातील गीते पींपरी येथे 38 वर्षीय सूर्यभान मस्केवर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय.

Jun 6, 2016, 10:16 AM IST

राज्यातल्या विद्यार्थ्यांना द्यावी लागणार 'नीट' परीक्षा

राज्यातल्या विद्यार्थ्यांना द्यावी लागणार 'नीट' परीक्षा

May 10, 2016, 03:07 PM IST

राज्यातील घडामोडी पाहा झटपट

राज्यातील घडामोडी पाहा झटपट

Dec 15, 2015, 09:20 PM IST