राज्यात एक कोटीपेक्षा जास्त रेशन कार्ड्स बोगस

राज्यात तब्बल एक कोटीपेक्षा जास्त रेशन कार्ड्स बोगस असल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलीय. आशारसोबत रेशन कार्ड  जोडल्यामुळं बोगस कार्डबाबतची माहिती समोर आल्याचं त्यांनी सांगितलं. बोगस कार्ड्सचा आकडा दीड कोटीपर्यंत जाण्याची शक्यताही मुख्यमंत्र्यांनी वर्तवलीय.

Updated: Dec 7, 2016, 03:37 PM IST
राज्यात एक कोटीपेक्षा जास्त रेशन कार्ड्स बोगस  title=

नागपूर : राज्यात तब्बल एक कोटीपेक्षा जास्त रेशन कार्ड्स बोगस असल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलीय. आशारसोबत रेशन कार्ड  जोडल्यामुळं बोगस कार्डबाबतची माहिती समोर आल्याचं त्यांनी सांगितलं. बोगस कार्ड्सचा आकडा दीड कोटीपर्यंत जाण्याची शक्यताही मुख्यमंत्र्यांनी वर्तवलीय.

बोगस कार्डमुऴं मोठ्या प्रमाणात धान्य काळ्या बाजारात जातं. त्यामुळं पुढच्या तीन महिन्यात सर्व रेशनिंग दुकानांवर पॉस मशिन बसवण्यात येईल. तसंच बायोमेट्रीक पद्धतीनं धान्य वितरीत केलं जाणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली.