राज आणि अजित पवारांमध्ये जुगलबंदी
राज ठाकरे आणि अजित पवार या दोन नेत्यांधील शाब्दीक युद्धानं सध्या चांगलाच पेट घेतला आहे. राज ठाकरेंची टीका त्याला अजितदादांच चोख उत्तर आणि त्यावर पुन्हा राज यांचा पलटवार असं चक्र मागील पंधरवड्यापासून सुरु आहे. राजकारणातील दोन मातब्बर पुतण्यांमध्ये कोणत्या मुद्यावर जुगलबंदी सुरु आहे.
Feb 24, 2013, 10:37 PM ISTराज ठाकरेंची भाषणे भंपक – अजित पवार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषणे आणि दौरे ही सगळी भंपकगिरी आहे, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सोलापूर दौऱ्यात लगावला.
Feb 18, 2013, 06:55 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री माजले आहेत- उद्धव ठाकरे
मुंबईत विराट कामगार मोर्चात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण..... ३५ कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. २ लाख कामगार मोर्चात सहभागी झाले आहेत. शिवसेनेचा कामगारांना पाठिंबा दिला आहे. या प्रसंगी भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी पुढील मुद्दे माडंले-
Feb 18, 2013, 06:50 PM ISTराज आणि बाळासाहेबांवर अजितदादांनी डागली तोफ
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रव्यापी दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची नक्कल करत त्यांची टिंगल केली होती. राज ठाकरेंच्या सभांना गर्दीही चांगलीच जमली होती. मात्र गर्दीचं रुपांतर कधी मतांमध्ये होत नसतं अशी टीका आता त्यावर अजित पवारांनी केली आहे.
Feb 18, 2013, 04:05 PM ISTपुण्यात मनसेची राष्ट्रवादीसोबत छुपी युती?
कधी तटस्थ राहत, कधी बहिष्कार टाकत तर कधी थेट पाठिंबा देत मनसेनं राष्ट्रवादीला मनसे साथ दिल्याचं पाहायला मिळालं. .पुणे शहराचा विकास आराखडा मजूर करताना तर मनसेने उपसूचना देत, सोयीस्कर मौन पाळलं.
Feb 12, 2013, 06:45 PM ISTठाणे महापालिकेत मनसेचा राष्ट्रवादीशी काडीमोड!
ठाणे महापालिकेत राष्ट्रवादीप्रणित लोकशाही आघाडीत सहभागी असलेली मनसे आघाडीशी काडीमोड घेण्याच्या तयारीत आहे. लोकशाही आघाडीतून मनसे बाहेर पडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यासाठी मनसेनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
Feb 11, 2013, 05:00 PM ISTश्वेतपत्रिकेवरून राष्ट्रवादीने केलं मुख्यमंत्र्यांना टार्गेट
MMRDA ची श्वेतपत्रिका काढण्याच्या मुद्दावरुन राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना पुन्हा टार्गेट केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात चिमटा काढला आहे.
Feb 7, 2013, 09:00 PM ISTपंतप्रधानपदाच्या शर्यतीत शरद पवारही!
काँग्रेस सरकार राहुल गांधी यांना पंतप्रधानपदी बसवण्याची तयारी करत आहे, तर दुसरीकडे एनडीएमध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळणार का? याची उत्कंठा आहे. मात्र युपीए सरकारमध्ये शरद पवार यांचं नावही पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पुढे केलं आहे.
Jan 30, 2013, 05:41 PM ISTमुख्यमंत्र्यांचं विधान चुकीचं - अजित पवार
मुख्यमंत्री खोटं बोलत असल्याची जोरदार टीका करत अजित पवारांनी खळबळ उडवून दिली आहे. राज्य बँकेवर प्रशासकांची नियुक्ती झाल्यानंतरच लायसन्स मिळालं, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. याचा समाचार घेताना, अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना खोटं ठरवलं.
Jan 27, 2013, 07:19 PM IST`संघाचे तालिबानशी संबंध`, राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
तालिबानी समर्थक नेत्यांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संबंध आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. याप्रकरणी भाजपनं स्पष्टीकरण देण्याची मागणीही मलिक यांनी केली आहे.
Jan 24, 2013, 06:23 PM ISTमेट्रो स्टेशन की शिवसृष्टी, काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली
काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मेट्रो स्टेशनच्या जागेबाबत घेतलेल्या परस्परविरोधी भूमिकांमुळे पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पासमोर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. ज्या ठिकाणाहून मेट्रो सुटणार आहे त्या ठिकाणी मेट्रो स्टेशन करायचे की शिवसृष्टी यावरुन या दोन्ही पक्षात जुंपलीय.
Jan 23, 2013, 06:54 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत श्रेयाची लढाई
अनधिकृत बांधकामावरून पिंपरी-चिंचवडमधलं राजकारण सध्या चांगलंच तापलंय. अनधिकृत बांधकाम थांबवण्याचे श्रेय घेण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चढाओढ लागली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही आमदारांनी याप्रकरणी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता शिवसेनाही या प्रश्नावरुन मैदानात उतरली आहे.
Jan 22, 2013, 09:55 PM ISTराष्ट्रवादीच्या बैठकीत मंत्रीमंडळात फेरबदलाची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या महत्वाची बैठक होणार आहे. पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी ही बैठक बोलावली आहे.
Jan 6, 2013, 10:53 PM IST`महापौर केसरी`वरून राष्ट्रवादी आणि विरोधकांमध्ये कुस्ती
पुणे महापालिकेत सध्या राजकीय कुस्तीचा आखाडा चांगलाच रंगलाय. त्यासाठी निमित्त ठरलंय ते महापौर केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं...या स्पर्धेसाठी महापालिका दीड कोटी रुपये खर्च करणार आहे. मात्र, महापालिकेनं निधीची ही तरतूद केली आहे ती, विकास कामांना कात्री लाऊन.
Jan 3, 2013, 11:23 PM ISTराष्ट्रवादीचा काँग्रेसला `संदेश`!
राष्ट्रवादीचे कणकवलीचे माजी नगराध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कार्याध्यक्ष संदेश पारकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. नारायण राणे आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.
Jan 2, 2013, 09:34 PM IST