राष्ट्रवादी काँग्रेस

पवारांवर काँग्रेसचा प्रतिहल्ला

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वबळाच्या भाषेला काँग्रेसनंही आक्रमक उत्तर दिलंय. स्वबळावर लढून राष्ट्रवादीला विरोधात बसायचे आहे का असा खोचक सवाल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय.

Jan 1, 2013, 09:18 PM IST

काँग्रेसच्या दगाफटक्यावर शरद पवार नाराज

काँग्रेसने गुजरातमध्ये केलेल्या दगाफटक्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी असून 2014 साली होणा-या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे.

Dec 31, 2012, 08:29 PM IST

NCP कार्यकर्त्यांनी फाडून जाळले थर्टी फर्स्ट पार्ट्यांचे फलक

पुण्यात थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी जागोजागी फलक लागले होते. वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ३१ डिसेंबरच्या मद्य पार्ट्यांच्या निमंत्रणासाठी लावलेले फलक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फाडून जाळून टाकले.

Dec 31, 2012, 05:49 PM IST

पुण्याचं काही खरं नाही....

पुणे महापालिकेची २०१२ मध्ये निवडणूक झाली. पुण्याला नवीन कारभारी मिळाले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता अधिक घट्ट झाली.

Dec 28, 2012, 09:07 AM IST

राष्ट्रवादीची कॉलेजपातळीवरही टगेगिरी, केला गोळीबार

राजकीय पक्षांमधील वैमनस्य हे कौटुंबिक पातळीवरही पोहोचू लागल्याचं कोल्हापूरमधील एका घटनेमध्ये दिसून आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांचा मुलगा युद्धवीर गायकवाड याने ज्येष्ठ भाजप नेते रामभाऊ चव्हाण यांचा नातू प्रसाद याच्या गाडीवर गोळी झाडली.

Dec 23, 2012, 05:25 PM IST

साहित्य संमेलनावरून राजकारण्यांचा तमाशा

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदावरुन निर्माण झालेला राजकीय वाद आता वैयक्तिक पातळीवर पोहचलाय. राष्ट्रवादीचे सरचिटणीस रमेश कदम यांनी भास्कर जाधवांनाही त्यांच्याच शब्दांत उत्तर दिल्यानं हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

Dec 11, 2012, 10:06 PM IST

दादांनी स्वत:लाच क्लिन चीट दिलीय का?

२५ सप्टेंबरला अजित यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा... ८ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ... केवळ ७२ दिवसांत घडलेलं हे नाट्यं...

Dec 7, 2012, 10:32 AM IST

राष्ट्रवादीचे मंत्री जाधव-तटकरे आमने-सामने

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे जवळचे विश्वासू आणि कोकणातील नेते जलसंपदामंत्री सुनील तटकरे आणि नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्यातील वाद उफाळून आला आहे. जाधव यांनी तटकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. मात्र, हा प्रयत्न जाधवांनाच अडचणीत आणणारा ठरण्याची शक्यता आहे.

Dec 6, 2012, 04:21 PM IST

श्वेतपत्रिकेतल्या शिफारशींवर उदयनराजे भोसले संतापले

खासदार उदयनराजे भोसले यांनी श्वेतपत्रिकेतल्या शिफारशींवर जोरदार टीका केलीय. 25 टक्क्यांपेक्षा जास्त खर्च न झाल्यास योजनाच तहकूब करण्याची शिफारस दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Dec 3, 2012, 06:39 PM IST

नाशिकमध्ये सत्ताधारींविरोधात शिवसेना-मनसेचा एल्गार

नाशिकच्या जिल्हा परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विकास निधीवरून चांगलच राजकारण पेटलंय. तीन महिने पाठपुरावा करूनही सत्ताधारी ताकास तूर लागू देत नसल्यानं संतापलेल्या विरोधकांनी तीन दिवसांपासून विविध माध्यमातून आंदोलन चालू ठेवलं.

Dec 1, 2012, 06:42 PM IST

पक्षातल्या तरूणांना डावलू नका, नाहीतर- अजितदादा

पक्षातल्या तरुणांना डावलू नका, असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय. जळगावमध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या पक्ष कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन शिबिर शुक्रवारी झालं.

Nov 10, 2012, 08:55 PM IST

सर्वसामान्य गॅसवर, काँग्रेस-राष्ट्रवादीत श्रेयाची लढाई

जादा 3 सिलिंडरला सबसिडी देण्याच्या निर्णयात मध्यमवर्गीयांवर अन्याय झाला असला, तरी आता या मुद्द्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत श्रेय घेण्याची लढा सुरु झाली आहे. दोन्ही पक्षांनी प्रसिद्धीपत्रके काढत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु केलाय.

Nov 8, 2012, 07:43 PM IST

`मद्यराष्ट्रा`ची झिंग, राष्ट्रवादी विरुद्ध `बंग`

महाराष्ट्र मद्यराष्ट्र झालंय, ही अभय बंगांची टीका राष्ट्रवादीला चांगलीच झोंबलीय. बंग यांचं विधान हे मानसिक बकालपण असल्याची टीका राष्ट्रवादीनं केलीय. अभय बंगांनी राज्यातल्या मद्याचा मुद्दा उचलल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनीही राज्याच्या मद्यधोरणावर कडाडून टीका केलीय.

Nov 5, 2012, 06:14 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर सर्वाधिक गुन्हेगार - माणिकराव

एखाद्या पक्षात सर्वात जास्त गुन्हेगार शोधायचे झाल्यास ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच सापडतील, अशी बोचरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली आहे.

Nov 2, 2012, 06:30 PM IST

'केंद्रातील यूपीए सरकार हे शरद पवारांमुळेच!'

राष्ट्रवादीनं मिशन 2014ची तयारी सुरू केलीय. राष्ट्रवादी हाच राज्यातील एक नंबरचा पक्ष असून पुढील निवडणुकीत राष्ट्रवादीला जास्त जागा हव्या असल्याचं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी केलय.

Oct 20, 2012, 12:47 PM IST