सुप्रियाताईंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांची एंट्री!
हिंजवडी म्हणजे पुण्याचा मानबिंदू.. भारतातलं आघाडीच आय टी हब. पण या आय टी हबला अनेक समस्यांनी ग्रासलंय. या भागाकडे सुप्रिया सुळे यांनी विशेष लक्ष दिलंय. अनेकदा या भागाला भेटी देत त्यांनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. पण आता हे प्रश्न सोडवण्यासाठी दस्तूर खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच कंबर कसलीय.
Oct 16, 2012, 06:30 PM ISTअजित पवारांनी राष्ट्रवादीचा `ताप` वाढवला
माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार अजित पवार यांचा ताप उतरला तरी राष्ट्रवादीचा ताप वाढला आहे. अजित पवार यांनी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कार्यक्रमाला ताप आल्याच्या दुसऱ्या दिवशी हजेरी लावल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. अजित पवारांचा हा नाराजीचा ताप होता का, असा सवाल उपस्थित होत आहे.
Oct 11, 2012, 07:45 PM ISTअजित दादांचं नेमकं चाललंय काय?
एकीकडे अजित पवारांनी बडोद्यातल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला दांडी मारली असताना दुसरीकडं त्यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्येच त्यांना डावलण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.
Oct 10, 2012, 06:33 PM ISTकिरीट सोमय्यांचे काँग्रेस-राष्ट्रवादीवर सनसनाटी आरोप
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा सिंचन घोटाळ्याबाबत राष्ट्रवादीच्या नेते आणि मंत्र्यांवर खळबळजनक आरोप केलेत. अजितदादा-रामराजे निंबाळकर आणि सुनील तटकरेंनी मिळून सिंचन घोटाळा केल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केलाय. सिंचन घोटाळा करून त्याचा पैसा राष्ट्रवादी काँग्रेसनं 2009 च्या निवडणुकीसाठी वापरलाय.
Oct 9, 2012, 05:47 PM ISTउद्धव ठाकरेंनी केलं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन
आज शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. याच वेळी त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागावरील वादावरही भाष्य केलं. मात्र रॉबर्ट वढेरा यांच्याबद्दल बोलणं टाळलं
Oct 7, 2012, 08:29 PM ISTअजितदादा मुख्यमंत्री व्हावेतः सुप्रिया सुळे
अजितदादा मुख्यमंत्री झाले तर आपल्याला आवडेल अशी इच्छा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलयं. पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या युवती मेळाव्यात सुप्रिया ताईंनी जाहीर वक्तव्य केलयं.
Oct 2, 2012, 05:52 PM IST'श्वेतपत्रिका सादर करा, सत्य परिस्थिती लोकांसमोर येईल'
सिंचन प्रश्नावर श्वेतपत्रिका लवकर सादर करा, सत्य परिस्थिती लवकरच लोकांसमोर येईल, असं म्हणतानाच अजित पवार यांनी आपण सरकारबाहेर राहून जनकल्याणाची कामं करणार असल्याचं म्हटलंय.
Oct 1, 2012, 12:03 PM ISTराजीनामा तोंडावर फेकला- अजित पवार
माझी बदनामी करण्यासाठी मीडियाचा वापर केला जात आहे - अजितदादा
विरोधक जाणीवपूर्वक बदनामी करत आहेत - अजितदादा
पवार साहेबांवरही खोटे आरोप केले जात आहेत - अजितदादा
मीडिया मसाला मिळाला नाहीः शरद पवार
हा पवार विरुद्ध पवार वाद नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मीडियाला कोणताही मसाला मिळाला नसल्याची मिश्किल टिप्पणी पवार यांनी यावेळी केली.
Sep 28, 2012, 05:58 PM ISTशरद पवार दैवत, त्यांचा निर्णय मान्यः अजित दादा
शरद पवार हे माझे दैवत असून ते जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे, असे आज अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र राजीनाम्याबद्दल त्यांनी कोणतंही वक्तव्य न केल्याने अजूनही सस्पेन्स कायम आहे.
Sep 28, 2012, 05:14 PM ISTशरद पवार मुंबईत, जोर-बैठका सुरू
राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुंबईत दाखल झाले, असून दिवसभर जोर-बैठकाचा सिलसिला सुरू होता.
Sep 28, 2012, 04:41 PM ISTशरद पवारांशी मतभेद नाही - अजितदादा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी कोणताही वाद किंवा मतभेद नाही, हा वाद संपूर्ण माध्यमांनी तयार केला, असल्याचे अजित पवार यांनी आज येथे सांगितले.
Sep 26, 2012, 06:33 PM IST`अजितदादा राजीनामा मागे घ्या!`
अजित दादा तुम्ही उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागे घ्या अशी राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांनी मागणी केली आहे. अजितदादांच्या शक्तिप्रदर्शनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळाच्या बैठकीत ठराव मांडण्यात आला आहे. पवारांनी आमदारांच्या भावना जाणून घ्यावात अशी विनंती अजित पवार समर्थक आमदारांनी केली.
Sep 26, 2012, 02:43 PM ISTआमदार बाबासाहेब कुपेकर यांचं निधन
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब कुपेकर यांचे आज सकाळी निधन झाले. जसलोक रुग्णालयात आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे वय ७० होते. बाबासाहेब कुपेकरांनी यापूर्वी राज्यसभेचे सभापतीपदही भूषवले होते. गेल्या काही दिवसांपासून कुपेकर कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि ३ मुली असा परिवार आहे.
Sep 26, 2012, 11:07 AM ISTअजित पवारांच्या राजीमान्याचं कारणं काय?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज तडकाफडकी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला. जलसंपदा खात्यात घोटाळा झाल्याचा आरोप झाल्याचे कारण देऊन पवार यांनी राजीमाना दिला आहे.
Sep 25, 2012, 07:14 PM IST